Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: दाबोळीसाठी युवक काँग्रेस रस्त्यावर; ''आम्ही मोपाच्या विरोधात नाही पण...''

कतार, ओमानची विमानसेवा मोपा विमानतळावरून सुरु करावी यासाठी कंपन्यावर सरकारचा दबाब

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Congress आंतरराष्ट्रीय उड्डाणे मोपा येथे हलवल्याच्या विरोधात गोवा काँग्रेसने दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावर निदर्शने केली. दाबोळी विमानतळावरील आंतरराष्ट्रीय विमानसेवा व कार्गो सेवा हळूहळू मोपा विमानतळावर हलविण्यात येत असल्याच्या निषेधार्थ गोवा युवक काँग्रेसतर्फे निषेध फेरी काढण्यात आली. याप्रसंगी गोम्स यांनी माहिती देताना भाजपा सरकारच्या धोरणाचा निषेध केला.

गोवा प्रदेश युवक काँग्रेसने एअर इंडियाच्या विरोधात आंदोलन करत, एअर इंडियाची आंतरराष्ट्रीय उड्डाणे दाबोळी विमानतळावरून मोपा विमानतळावर हलवण्यास विरोध केला. २१ जुलै २०२३ पासून गोवा ते गॅटविक विमान, लंडन ते मोपा विमानतळावर उड्डाण करणारे आंतरराष्ट्रीय विमान स्थलांतरीत करण्यासाठी केंद्रातील तसेच राज्यातील भाजप सरकारच्या दबावाखाली एअरलाईन्स बळी पडल्याचा कॉंग्रेसने आरोप केला.

यावेळी बोलताना मोपा प्रदेश कॉंग्रेसचे नेते एल्वीस गोम्स यांनी भाजप सरकारच्या या कृतीचा आम्ही निषेध करत आहोत. कारण यामुळे दक्षिण गोवा जिल्हा व तेथील लोकांवर आणि पर्यटन उद्योगावर नकारात्मक परीणाम होईल. विशेषत: बहुतांश प्रवासी दक्षिण गोवा जिल्ह्यातून येतात तेव्हा हा मुद्दा अधोरेखित करण्यासाठी हा निषेध आहे असे त्यांनी सांगितले.

सरकारी यंत्रणा विकण्याचे षडयंत्र भाजप सरकारने चालवले आहे, हळूहळू गेट विक, ओमान, कतार आंतरराष्ट्रीय उड्डाणे मोपावर कार्यान्वीत होणार. त्यामुळे दक्षिण गोव्यातील लोकांना त्रास सोसावा लागेल. लोकांना आता 50 किलोमिटर लांब पल्ल्याचा प्रवास करावा लागेल तेव्हा अतिरीक्त आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागेल असे त्यांनी सांगितले.

आम्ही मोपा विरोधात नाही, तर जी विमान सेवा दाबोळी विमानतळावर चालू आहे, ती तशीच चालू राहू दे अशी आमची मागणी आहे.अतिरीक्त विमानसेवा मोपा विमानतळावर चालू करण्यास हरकत नाही. दोबोळी विमानतळ हा ऐतिहासिक विमानतळ आहे.गोवा - गेटविक हि आंतरराष्ट्रीय विमानसेवा दाबोळीहून हलवून मोपा येथून सुरु होणार आहे.

तसेच कतार, ओमानच्या विमानसेवा कंपन्यांनी आपली विमानसेवा मोपा विमानतळावरून सुरु करावी यासाठी त्या कंपन्यावर मोठा दबाब टाकण्यात येत आहे. दाबोळी विमानतळावरील आंतरराष्ट्रीय विमानसेवा हळूहळू मोपा विमानतळावर हलविण्यात येत आहेत.त्यासाठी विमानसेवा कंपन्यावर भाजपा सरकारकडून दबाब टाकला जात आहे.

त्यामुळे येणाऱ्या काळात दाबोळी विमानतळ बंद होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.तथापी आम्ही असे होऊ देणार नाही. दाबोळी विमानतळ बंद होणार नाही यासंबंधी आमचे प्रयत्न असल्याचे काँग्रेसचे एल्विस गोम्स यांनी सांगितले.

दाबोळी येथे सध्या अस्तिवात असलेली विमानसेवा तेथे हलविण्यास आमचा विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी प्रदीप नाईक, दक्षिण गोवा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश नदार यांची भाषणे झाली.

गोवा युवक काँग्रेसतर्फे निषेध फेरी काढण्यात येणार असल्याने दाबोळी विमानतळ परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

वास्कोचे पोलिस उपअधीक्षक सलिम शेख, निरीक्षक कपिल नायक वगैरे तेथे उपस्थित होते. तथापी निषेध फेरी शांततापूर्ण काढण्यात आल्याने तेथे कोणताही तणाव निर्माण झाला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT