Goa Bench Dainik Gomantak
गोवा

Comunidade Law: कोमुनिदाद कायदा दुरुस्तीस आव्हान! स्थगितीची मागणी नाकारली; पुढील सुनावणी 13 नोव्हेंबर रोजी

Comunidade Land Amendment: पुढील सुनावणी १३ नोव्हेंबरपर्यंत तहकूब केली आहे. राज्य सरकारकडून या याचिकेला उत्तर म्हणून औपचारिक प्रतिजबाब पुढील सुनावणीपूर्वी दाखल केला जाणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: गोवा कोमुनिदाद कायद्यातील अलीकडील दुरुस्तीविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने दुरुस्ती अंमलबजावणीला आव्हान देत याचिकादारांची स्थगितीची मागणी नाकारली.

यावरील पुढील सुनावणी १३ नोव्हेंबरपर्यंत तहकूब केली आहे. राज्य सरकारकडून या याचिकेला उत्तर म्हणून औपचारिक प्रतिजबाब पुढील सुनावणीपूर्वी दाखल केला जाणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात न्यायमूर्ती भारती डांगरे आणि आशिष चव्हाण यांनी हा निर्णय दिला.

ठरावीक मर्यादेपलीकडील (उदा. ३०० मीटर) अतिक्रमणे सरकार स्वतः हटवेल, ज्यामुळे कोमुनिदादच्या अनेक जमिनी पुन्हा उपलब्ध होतील. सध्या ज्या जमिनींवरून कोमुनिदादना कोणतेही उत्पन्न मिळत नाही, त्या जमिनींच्या नियमितीकरणातून आर्थिक परतावा मिळेल. दीर्घकाळापासून अस्तित्वात असलेले निवासी अतिक्रमण हटवणे अशक्य आहे आणि अशा खटल्यांना वर्षानुवर्षे न्यायालयीन विलंबाला सामोरे जावे लागते.

सरकारची बाजू भक्कम : एजी

राज्याचे महाधिवक्ता देविदास पांगम यांनी सुनावणीनंतर सांगितले की, याचिकाकर्त्यांनी दुरुस्तीला तात्पुरती स्थगिती मागितली होती; परंतु न्यायालयाने कोणतीही स्थगिती दिलेली नाही. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की न्यायालयात आमची बाजू मजबूत आहे आणि आम्ही यात यशस्वी होऊ, असे सांगून त्यांनी राज्य सरकारच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: CM पदाच्या शर्यतीत भंडारींपैकी कोणाचेच नाव नाही! रवी नाईकांनंतर भंडारी समाजात 'मॅग्नेटिक' नेत्याचा दुष्काळ; 2027 च्या निवडणुकीत कुणाचे भवितव्य पणाला?

Goa Politics: मुख्यमंत्र्यांनी गोवा विकायला काढला? काँग्रेसच्या 'राखण यात्रे'तून प्रमोद सावंतांवर थेट हल्लाबोल; साखळीचा 'सिकंदर' कोण? 

Goa ST Political Reservation: 'आता फसवणूक सहन करणार नाही!' 2027 च्या निवडणुकीपूर्वी एसटी समाजाला आरक्षण द्या; गोव्यात आंदोलनाचा एल्गार

Mhadei Water Dispute: केंद्राला पत्र पुरे, कोर्टाकडून पाहणीचा आदेश मिळवा! म्हादईचा लढा निर्णायक वळणावर; संयुक्त पाहणीसाठी गोव्याचा मोठा डाव

खरी कुजबुज: ...अन् त्‍यांच्‍या काळजात धस्स!

SCROLL FOR NEXT