Comunidade Land Dainik Gomantak
गोवा

Comunidade Land: सरकारचा 'तो' निर्णय म्हणजे गोंयकारांच्या खर्चाने स्थलांतरांना खूष ठेवण्याचा प्रयत्न- गोवा फॉरवर्ड

Comunidade Land In Goa कोमुनिदाद जमिनीवरील बेकायदेशीर घरांना वाचविण्‍याच्‍या निर्णयाला गोवा फॉरवर्ड पक्षाचा विरोध

गोमन्तक डिजिटल टीम

Comunidade Land In Goa गोवा फॉरवर्ड पार्टीचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी गोव्याचे मुख्‍यमंत्री प्रमाेद सावंत यांनी कोमुनिदाद जमिनीवरील बेकायदेशीर घरे पाडू नयेत यासाठी प्रस्तावित नियमांत बदल करण्‍याचा जो प्रस्‍ताव आणला आहे त्‍याला गोवा फॉरवर्ड पार्टीचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.

वादग्रस्त भूमिपुत्र विधेयकाला पुनरुज्जीवित करण्याचा हा छुपा प्रयत्न असे म्‍हणून हे प्रस्तावित उपाय, कायद्याचे पालन करणार्‍या गोव्यातील लोकांमध्ये आणि विशेषत: कायदेशीररित्या घरे मिळवण्यासाठी परिश्रम घेतलेल्या नागरिकांवर केलेला अन्‍याय अशी टीका त्‍यांनी केली आहे.

सरदेसाई यांनी म्‍हटले आहे की, सरकारचे हे पाऊल गोव्याच्या समुदायांच्या अखंडतेला ठेच पोहोचविणारे असून गोंयकारांच्या हक्कांची ती अवहेलना आहे. ‘‘मुख्यत: स्थलांतरितांनी अतिक्रमण केलेल्या जमिनीवर बांधलेली घरे कायदेशीर करण्याची ही कृती गोव्यातील लोकांच्या आचारसंहितेवरच घाला घालणारी आहे.

आपल्‍या जमिनीवर प्रेम करणार्‍या आणि कायद्यांचे पालन करणाऱ्यांचाही तो अपमान आहे. सरकारचा निर्णय म्‍हणजे, स्थानिक गोंयकारांच्या खर्चाने स्थलांतरितांची व्होट बँक खूष ठेवण्याचा हा निर्लज्ज प्रयत्न म्‍हणावा लागेल.

हे सरकार गोव्‍याच्‍या जनतेचे हित पाहण्‍यापेक्षा बाहेरच्‍या लोकांचे हित पहात आहे. त्‍यासाठी अशा अध्‍याध्‍येशाद्वारे यापूर्वी उच्च न्यायालयाने दिलेल्‍या निर्णयांना बगल देण्याचा प्रयत्‍न करत आहे.

सरकारच्या या वारंवार प्रयत्नांमागील हेतूंबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करीत राज्याच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जडणघडणीला धोका निर्माण करणाऱ्या बाह्य हस्तक्षेपांपासून गोव्याची भूमी गोंयकरांकडेच राहिली पाहिजे, असे त्यांनी प्रतिपादन केले.

ते पुढे म्हणाले: ‘‘गोवा फॉरवर्ड पार्टी सर्व गोंयकारांना स्थानिक नागरिकांच्या पेक्षा बाहेरच्‍या लाेकांच्‍या हितसंबंधांना प्राधान्य देणाऱ्या धोरणांविरुद्ध त्यांच्या भूमीचे आणि वारशाचे रक्षण करण्यासाठी त्यांच्या प्रयत्नांमध्ये एकत्र येण्याचे आवाहन करते’’.

गोव्याच्या भूमीसाठीचा लढा हा राज्याच्या अस्मितेचा आणि भविष्याचा लढा आहे यावर श्री. सरदेसाई यांनी भर दिला आणि समाजाने त्यांच्या हक्काशी तडजोड करणार्‍या आणि त्यांच्या मूळ भूमीच्या अखंडतेच्या विरोधात खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: ''भाजपला राज्यातील विरोधकांना संपवाचंयं, पण ते शक्य नाही...'', सरदेसाईंचा हल्लाबोल!

Goa Cabinet: ‘वाचाळवीर’ स्कॅनरखाली! चार मंत्र्यांना वगळून नव्यांना संधी द्या; मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांना उधाण

Goa Tourism: पर्यटनाच्या नव्या संधी उपलब्ध होणार; गोवा-उझबेकिस्तान संबंधांना मिळणार नवा आयाम!

Benaulim: बाणावलीची जागा काँग्रेसच लढणार; निंबाळकरांनी विधानसभा निवडणुकीबाबत केले मोठे विधान

Goa Crime: वेश्या रॅकेट चालवणाऱ्या टोळीतील चौथा आरोपी अटकेत; गोवा पोलिसांनी आवळल्या मुसक्या

SCROLL FOR NEXT