Betim, Bardez: बेती येथे घराच्या अंगणात खेळणाऱ्या पाच वर्षीय मुलीच्या अंगावर कॉन्क्रीट खांब पडून मृत्यू झाला आहे. उपचारासाठी तिला गोमेकॉत दाखल करण्यात आले मात्र, उपचारादरम्यान तिच्या मृत्यू झाला.
पर्वरी पोलिसांनी याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यूचे प्रकरण नोंद केले आहे.
तनिषा सचिन दामवरकर (वय ०५, रा. बेती, बार्देश) असे मृत्यू झालेल्या लहान मुलीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तनिषा मोडकळीस आलेल्या घराच्या बाहेर अंगणात खेळत होती. घर मोडकळीस आल्याने त्यात सध्या कोणी वास्तव्य करत नाही. दरम्यान झोका घेण्यासाठी या घराच्या दोन कॉन्क्रीट खांबांना केबल बांधण्यात आली होती.
मुलगी झोका घेत असताना एक खांब कोसळून तिच्या तोंडावर पडला, यात मुलीला गंभीर जखम झाली.
दरम्यान, उपचारासाठी तिला तात्काळ गोमेकॉत दाखल करण्यात आले मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
पर्वरी पोलिसांनी याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यूचे प्रकरण नोंद केले असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.