डिचोली विभागीय कृषी कार्यालयाचे सहायक कृषी अधिकारी पंकज पोकळे यांनी वरगाव येथे जाऊन भात कापणी आणि मळणीच्या कामाची पाहणी केली. यावेळी जि पं सदस्य शंकर चोडणकर तसेच शेतकरी उपस्थित होते. Dainik Gomantak
गोवा

डिचोलीत भाताच्या 'कापणी आणि मळणी'च्या कामांची लगबग

पिळगाव, मये आदी भागात भात कापणी आणि मळणीची कामे जोरात सुरु

Dainik Gomantak

Goa: डिचोली (Bicholim) तालुक्यातील बहूतेक सर्व भागात भात पूर्णपणे पिकून तयार झाले (Rice Production) असून, सध्या भातकापणी आणि मळणीच्या कामांची लगबग सुरु झाली आहे. पावसाने कृपादृष्टी केली आणि वेळेवर कापणी यंत्रे उपलब्ध झाली, तर येत्या आठवड्यापर्यंत ही कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. सध्या पिळगाव, मये आदी भागात भात कापणी आणि मळणीची कामे जोरात सुरु आहेत. काही शेतकऱ्यांनी ही कामे आटोपूनही घेतली आहेत. कृषी क्षेत्रात आधुनिकतेचा शिरकाव झाल्यापासून क्वचित ठिकाणी वगळता बहूतेक भागात यंत्राद्वारे भाताची कापणी आणि मळणी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल असल्याचे दिसून येत आहे.

कृषी खात्याकडून अनुदान

यंत्राद्वारे भाताची कापणी आणि मळणी करण्यासाठी शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान देण्याची कृषी खात्याची योजना आहे. यंत्राद्वारे भाताची कापणी आणि मळणी करण्यासाठी प्रति तासामागे 2 हजार 400 रुपये भाडे आकारण्यात येते. तर कृषी खात्याकडून मिळणाऱ्या अनुदानामुळे शेतकऱ्यांना कापणी आणि मळणीच्या भाड्यापोटी प्रति तासामागे केवळ बाराशे रुपये भरावे लागतात.

पारंपरिक पद्धतीने कापणी

शेतीचे कमी प्रमाण आणि चिखल वा अन्य कारणामुळे ज्या शेतीत कापणी यंत्र नेणे शक्य होत नाही. त्या शेतीत शेतकऱ्यांना परंपरिक पद्धतीने कापणी आणि मळणीची कामे आटोपून घ्यावी लागतात. यासाठी कामेरी आणि मानाय मिळणे दुरापास्त तर होत आहेतच, उलट या मजुरांची मजुरीही परवडत नाही. असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या पिळगाव भागातील काही शेतीत पारंपरिक पद्धतीने भाताची कापणी करण्यात आली आहे.

कृषी अधिकाऱ्यांकडून पाहणी

डिचोली विभागीय कृषी कार्यालयाचे सहायक कृषी अधिकारी पंकज पोकळे यांनी आज (मंगळवारी) वरगाव भागात जाऊन भात कापणी आणि मळणीच्या कामाची पाहणी केली. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य शंकर चोडणकर तसेच शेतकरी उपस्थित होते. पावसाच्या व्यत्ययाशिवाय वेळेवर कामे पूर्ण झाल्यास भातपिक समाधानकारक मिळणार असल्याचा दावा कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT