पाण्याची टाकी कार्यान्वित करताना मंत्री मॉवीन गुदिन्हो बाजूस इतर मान्यवर. Dainik Gomantak
गोवा

Goa: नवे वाडे येथील ओव्हर हेड पाण्याची टाकी कार्यान्वित करण्याचा शुभारंभ

नवीन टाकीमुळे पहाटे पाणी सोडण्यात येईल.सदर सुविधा जायका प्रकल्पांतर्गत करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमन्तक

दाबोळी: नवे वाडे येथील ओव्हर हेड पाण्याची टाकी कार्यान्वित करण्याचा शुभारंभ दाबोळीचे आमदार(MLA) व वाहतुक मंत्री (Minister of Transport) मॉवीन गुदिन्हो यांच्या हस्ते करण्यात आला.750 घनमीटर क्षमतेच्या या टाकीमुळे नवे वाडेतील पाणी समस्या दुर होईल अशी आशा गुदिन्हो यांनी व्यक्त केली. याप्रसंगी नवीन जलवाहिनीही कार्यान्वित करण्यात आली.

नवे वाडे येथील बरीचशी पाणी समस्या दूर करण्यात आपणास यश आले आहे. भविष्यात दाबोळी मतदार संघातील (constituency) इतर उणीवाही दूर करण्यात येतील असे गुदिन्हो यांनी सांगितले. दाबोळीच्या हित व विकासासाठी मी नेहमी प्रयत्न व काम केले आहे. याची मतदारांना जाणीव असल्याने ते माझ्या पाठिशी राहतील यात शंकाच नाही. निवडणुक जवळ आल्यावर विविध पक्ष निवडणूक (election) रिंगणात उतरतात आणि निवडणुकीनंतर गायब होतात असे ते म्हणाले. जॉगर्स पार्कच्या दुसरया टप्प्याचे काम लवकरच सुरु होणार आहे. तेथे नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अभियंते विश्वंभर भेंडे यांनी 750 क्षमतेच्या या टाकीसाठी पंप हाऊस असल्याचे सांगितले. त्यामध्ये दोन पंप आहेत.प्रतितास 250 धनमीटर पाणी खेचण्याची क्षमता त्या पंपांची आहे.त्यामुळे नवे वाडे व आसपास मुबलक प्रमाणात पाणी मिळेल. पूर्वी रात्री पाणी पुरवठा होत असे. नवीन टाकीमुळे पहाटे पाणी सोडण्यात येईल. सदर सुविधा जायका प्रकल्पांतर्गत करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

याप्रसंगी चिखलीचे सरपंच सॅबी परेरा, नगरसेवक सुदेश भोसले, विनोद किनळेकर, जिल्हा पंचायत सदस्य अनिता थोरात, मंडळ अध्यक्ष संदीप सूद वगैरे उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sanjivani Sugar Factory: 'संजीवनी'च्या पुनरुज्जीवन प्रक्रियेला गती, निविदा मुदत 5 फेब्रुवारीपर्यंत वाढवली; प्रकल्पासाठी 4 कंपन्यांकडून उत्सुकता

Goa Drug Case: कपड्यांखाली लपवले होते 3 कोटींचे ड्रग्स! मोपा विमानतळावरून विदेशी पर्यटकाला अटक

MI VS RCB: 6,4,6,4... नॅडिन डी क्लार्कची झुंजार खेळी, आरसीबीनं मुंबईच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास Watch Video

Shukra Budh Yuti 2026: धनिष्ठा नक्षत्रात 'लक्ष्मी-नारायण' योग: 'या' 4 राशींना मिळणार अपार यश आणि धनदौलत!

Goa Nightclub Fire: 'बर्च' घटना अपघात म्हणून सोडून द्यावी? 25 जण जिवंत जळाले तरी सरकार गप्प का? युरी आलेमाव यांचा सवाल

SCROLL FOR NEXT