Colvale Jail  Dainik Gomantak
गोवा

Colvale jail: कारागृहाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; महिलेकडून रशियन कैद्यासाठी फोन, सिमकार्डची तस्करी

Colvale jail: कारागृहातील एका अंडर-ट्रायल असलेल्या रशियन कैद्याला ती हे सर्व साहित्य देत असल्याचीही माहिती समजतेय.

गोमन्तक डिजिटल टीम

Colvale jail: कोलवाळ कारागृह नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असते. आता पुन्हा या कारागृहाशी संबंधित एक धक्कदायक बाब समोर येतेय. कारागृहातील मोबाईल तस्करीप्रकरणी एका महिलेला IRB कर्मचार्‍यांनी पकडले असल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय.

सदर महिला तिच्या कपड्यात लपवून मोबाईल फोन आणि चार सिमकार्डच्या तस्करीचा प्रयत्न करत असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.

दरम्यान कारागृहातील एका अंडर-ट्रायल असलेल्या रशियन कैद्याला ती हे सर्व साहित्य देत असल्याचीही माहिती समजतेय.

सदर महिला आणि तो रशियन कैदी यांचा नेमका काय संबंध आहे तसेच या कृत्यामध्ये अजून किती जणांचा समावेश आहे याचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकारामुळे कारागृहाच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

काही दिवसांपूर्वी कारागृहाचा सुरक्षारक्षक कैद्यांना गांजा पुरवत असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्याच्या बुटाच्या सोलमध्ये गांजा सापडला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT