Colvale Jail Dainik Gomantak
गोवा

Colvale Jail: कोलवाळ कारागृहातील सहाय्यक अधीक्षकासह तिघे निलंबित, 'या' कारणास्तव करण्यात आले निलंबन

काही दिवसांपूर्वी चिकन वाढण्याच्या कारणावरून कैद्यांमध्ये हाणामारी झाली होती.

Ganeshprasad Gogate

Colvale Jail: नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असलेले कोलवाळ कारागृह पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. येथे घडलेल्या एका प्रकारामुळे कारागृह महानिरीक्षकांकडून चौघा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

दरम्यान मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार दसऱ्यानिमित्त कोलवाळ कारागृहात कैद्यांना ‘रावणवध’ उत्सवासाठी फटाक्यांचा वापर करण्यास परवानगी दिल्याने कारागृहातील सहाय्यक अधीक्षक, दोन जेलर व एक सहाय्यक जेलर यांना निलंबित करण्यात आल्याचे समजतेय.

निलंबित केलेल्यांमध्ये सहायक अधीक्षक चंद्रकांत हरिजन, जेलर महेश फडते, तुरुंगाधिकारी अनिल गावकर, जेलर रामनाथ गौडे यांचा समावेश आहे

या प्रकरणी कारागृह महानिरीक्षकांकडून निलंबनाचा आदेश जारी करण्यात आला असून त्यांच्याकडे घडलेल्या घटनेबाबत स्पष्टीकरण मागवण्यात आल्याचे समजतेय. काही दिवसांपूर्वी चिकन वाढण्याच्या कारणावरून कैद्यांमध्ये हाणामारी झाली होती.

यात काही कैद्यांना दुखापत देखील झाली होती. त्यानंतर कारागृह कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करत वाद मिटवला होता. तसेच जखमींना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

SCROLL FOR NEXT