Woman Tourist Found On Goa Highway Dainik Gomantak
गोवा

Colvale: रस्त्यावर झोपलेल्या अवस्थेत आढळली महिला पर्यटक, भाषेच्या अडचणीमुळे स्थानिकांशी संवाद कठीण; कोलवाळ हायवेवरील धक्कादायक प्रकार

Woman Tourist Found On Goa Highway: गोव्यातील कोलवाळ हायवेवर एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

Manish Jadhav

Woman Tourist Found On Goa Highway: गोव्यातील कोलवाळ हायवेवर एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एनएच 66 वरील बिनानी फॅक्टरीजवळ आंध्र प्रदेशातील एक महिला पर्यटक रस्त्यावर झोपलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. तिच्यासोबत आलेल्या लोकांनीच तिला सोडून दिल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. भाषेची अडचण आणि महिलेची अवस्था यामुळे स्थानिकांशी संवाद साधणे कठीण झाले. स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिल्यानंतर कोलवाळ पोलिसांनी महिलेला सुरक्षितपणे ताब्यात घेतले.

महामार्गावरील धोका

एनएच 66 हा अत्यंत वर्दळीचा महामार्ग आहे. अशा वर्दळीच्या महामार्गावर एका महिलेला (Women) रस्त्यावर झोपलेल्या अवस्थेत पाहून प्रवाशांसह स्थानिक नागरिकही थक्क झाले. उपस्थितांनी तिला मदत करण्याचा प्रयत्नही केला पण ती पूर्णपणे भांबावलेल्या अवस्थेत असल्याने आणि भाषेची अडचणीमुळे तिच्याकडून कोणतीही माहिती मिळत नव्हती.

पोलिसांनी दाखवले प्रसंगावधान

स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती देताच, कोलवाळ पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कोणताही वेळ न दवडता महिलेला सुरक्षितपणे ताब्यात घेतले. तिला प्राथमिक चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले. पोलिसांचे पहिले उद्दिष्ट तिच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे होते. प्राथमिक चौकशीत ती आंध्र प्रदेशची पर्यटक असल्याचे समोर आले. पोलिसांनी तिच्यासोबत असलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. तिच्यासोबत असलेले कोण होते आणि त्यांनी तिला या ठिकाणी का सोडले, याचा तपास पोलीस करत आहेत.

तपासाची दिशा

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला आपल्या सहकाऱ्यांसोबत गोव्यात पर्यटनासाठी आली होती. पण तिच्यासोबतच्या लोकांनी तिला का सोडले, यामागे काही वाद होता का, किंवा तिच्यासोबत काही गैरप्रकार घडला का, याचा शोध पोलीस घेत आहेत. पोलिसांचे एक पथक तिच्या कुटुंबीयांचा शोध घेण्यासाठी आंध्र प्रदेश पोलिसांशी संपर्क साधत आहे. तिच्याकडे कोणतेही ओळखपत्र किंवा कागदपत्रे सापडलेली नाहीत. त्यामुळे तिची ओळख पटवणे पोलिसांसाठी एक मोठे आव्हान बनले आहे.

या घटनेने गोव्यातील (Goa) पर्यटकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी दाखवलेले प्रसंगावधान आणि स्थानिक नागरिकांनी दाखवलेल्या माणुसकीमुळे एक मोठा अनर्थ टळला. या घटनेमागील सत्य लवकरच समोर येईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda Footpath Encroachment: फोंड्यात चालायचे कुठून? पदपथांवर अतिक्रमण, पार्किंगच्या जागांवर जाहिरात फलकांची वाहने!

Upcoming SmartPhones: 10,000 mAh बॅटरी, 200MP कॅमेऱ्यासह मिळणार भन्नाट फीचर्स! या आठवड्यात लॉन्च होणार 'हे' दमदार स्मार्टफोन

SIR Protest India: 'एसआयआर'विरोधी आंदोलन निर्णायक वळणावर

Goa Politics: 'तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना'; मगो-भाजप युतीत फोंडा-शिरोड्याचा पेच!

Goa Politics: आरजीतील अंतर्गत वाद पुन्हा चिघळला! 'पक्षाला हानी पोहोचवल्यास कारवाई', वीरेश बोरकरांचा खोलकरांना इशारा

SCROLL FOR NEXT