Colvale Central Jail Dainik Gomantak
गोवा

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात गांजाची 'गोळाफेक', अल्पवयीन मुलासह चौघांचा समावेश, तिघांच्या अटकेसह दीड किलो गांजा जप्त

Marijuana Smuggling in Colvale Central Jail: कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहात गांजाचा पुरवठा करण्याचा प्रयत्न उधळून लावत गोवा पोलिसांनी मोठी कारवाई केली.

Manish Jadhav

कोलवाळ: कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहात गांजाचा पुरवठा करण्याचा प्रयत्न उधळून लावत गोवा पोलिसांनी मोठी कारवाई केली. या प्रकरणी अल्पवयीन मुलासह चौघांचा समावेश असून, तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे. ही घटना 14 जून रोजी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, संशयितांनी गांजाचे बॉलच्या आकाराचे तब्बल सात गोळे तयार करुन कारागृहाच्या आतमध्ये फेकण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, कारागृह प्रशासनाच्या सतर्कतेमुळे हा कट उधळून लावण्यात आला. या सात गोळ्यांमधून एकूण दीड किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.

दरम्यान, तपासाअंती पोलिसांनी तिघांना अटक केली असून चौथा संशयित हा अल्पवयीन आहे. त्याच्याविरोधातही संबंधित कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु असून अधिक चौकशी केली जात आहे. गोव्यातील (Goa) तुरुंगात अशा प्रकारे अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी पोलिस यंत्रणा अधिक दक्ष झाली आहे. या प्रकरणामुळे कारागृहाच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Election Commission: केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कारवाईला आम्ही कंटाळलो! 'गोवा काँग्रेस पक्ष' नोंदणी प्रक्रियेसंदर्भात कोर्ट नाराज

VIDEO: वकिलाची गाडी अडवून मारहाण अन् शिवीगाळ, आमदार पुत्राची गुंडगिरी; तक्रारीनंतरही FIR नाही, पोलिसांच्या भूमिकेवर सवाल!

Myanmar Airstrike: म्यानमारमध्ये मृत्यूचं भयानक तांडव! गजबजलेल्या बाजारात अचानक हवाई हल्ला; 49 जणांचा मृत्यू; 58 जखमी, थरारक VIDEO समोर

Horoscope: संकष्टी चतुर्थीला जुळून आलाय अत्यंत दुर्मिळ शुभ योग! बाप्पाच्या आशीर्वादाने 'या' 5 राशींचे उघडणार नशिबाचे दरवाजे, नोकरी-व्यवसायात प्रगतीचे संकेत

Monsoon: पावसाळा संपायला अवघे 3 दिवस, तरी राज्यात पावसाची मोठी तूट; यंदा 36.41 इंच पाऊस कमी

SCROLL FOR NEXT