Goa College of Agriculture:  Dainik Gomantak
गोवा

Goa College of Agriculture : गोवा कृषी महाविद्यालयात गांडूळ खत निर्मितीचे प्रशिक्षण

Goa College of Agriculture : सर्व महिला सहभागींना भाजीपाला, शेतात आणि बागायती पिकांसाठी गांडूळ खताचा वापर आणि फायदे जाणून घेण्याची संधी मिळाली.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa College of Agriculture :

पणजी, गोवा कृषी महाविद्यालय आणि जिल्हा ग्रामीण विकास संस्थेने गोवा राज्य ग्रामीण उपजीविका अभियानांतर्गत नानोडा, डिचोली गावातील महिला स्वयंसाहाय्य गटांना गांडूळ खत निर्मितीचे प्रशिक्षण दिले.

प्रशिक्षणादरम्यान कृषी विज्ञान विभागाच्या साहाय्यक प्राध्यापिका सलोनी पाटील यांनी गांडूळ खत निर्मितीचे टप्पे, काळजी, देखभाल आणि फायदे सांगितले. डीटीएम एफएल-डीआरडीए नॉर्थचे मंदार गावस यांनी गांडूळ खतासाठी उपलब्ध असलेल्या विविध योजना आणि अनुदानाची माहिती दिली.

सर्व महिला सहभागींना भाजीपाला, शेतात आणि बागायती पिकांसाठी गांडूळ खताचा वापर आणि फायदे जाणून घेण्याची संधी मिळाली. गांडूळ खत तयार करण्याचा प्रत्यक्ष अनुभवही त्यांना मिळाला. प्रशिक्षणात अंतिम वर्षाचे सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते.

महिला स्वयंसाहाय्य गटातील सर्व सहभागींना गांडूळ खताचे बेड सादर करण्यात आले, ज्याचा वापर दर्जेदार गांडूळ खत, व्हर्मी वॉश आणि कंपोस्ट तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो. संजय नितावे, सलोनी पाटील, अक्षया कळंगुटकर आणि सहर्ष मळकर्णेकर हे सर्व कृषी शास्त्र विभागात साहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्या सर्वांनी प्रशिक्षण उपक्रमांचे समन्वयन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli World Record: विराट कोहलीची अवघ्या 7 धावांची खेळी, पण रिकी पाँटिंगचा विश्वविक्रम मोडला! न्यूझीलंडविरुद्ध बनला नंबर 1 फलंदाज

VIDEO: डिचोलीत भीषण अपघात; जिममधून घरी परतताना दुचाकीवरील नियंत्रण सुटलं, 22 वर्षीय तन्मयचा उपचारादरम्यान मृत्यू

Goa Pollution Control Board: धारबांदोड्यातील हॉटमिक्स प्रकल्प सुरू करण्यास मनाई, उच्च न्यायालयाचा दणका; प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परवानगीला आव्हान

Women’s T20: श्रेया परबची नाबाद 52 धावांची झुंज व्यर्थ; महाराष्ट्राने गोव्याला 12 धावांनी नमवले

Viral Video: मोबाईल ठेवायला जागा नाही म्हणून थेट चाकू बाहेर काढला! ट्रेनमधील तरुणाच्या कृत्याने प्रवासी संतप्त, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT