Environmental Concerns Halt Chapora River Dredging Project
पणजी: शापोरा नदीतील गाळ काढणे लांबणीवर पडू शकते. गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने या गाळ काढण्याचा नदीच्या पर्यावरणावर होऊ शकणाऱ्या प्रतिकूल परिणामांचा अभ्यास आवश्यक असल्याचे मत व्यक्त केला आहे. यामुळे तसा अहवाल आता बंदर कप्तान खात्याला तयार करावा लागणार आहे.
गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या तज्ज्ञ समितीने शापोरा नदीतील गाळ काढण्याच्या प्रस्तावित ठिकाणांची तपासणी केली आहे. बंदर खात्याच्या प्रस्तावानुसार, शापोरा नदीत गाळ उपसण्याचे काम केले जाणार आहे. या पाहणीनंतर प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे, की गाळ काढण्याच्या प्रक्रियेत आणि नंतरच्या काळात पर्यावरणीय परिणामांचे मूल्यमापन करणे आवश्यक आहे.
तज्ज्ञ समितीने हायड्रोडायनॅमिक्स आणि भू-आकृतीत होणारे बदल, तसेच वाहतूक व्यवस्थेवर आणि नदीच्या आसपासच्या किनाऱ्यांवर होणाऱ्या परिणामांचे मूल्यांकन करणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर गाळ हलविण्याची वैशिष्ट्ये, गाळ संचय आणि खालावत चाललेल्या सागरी जीवसृष्टीवर होणारा परिणाम याचेही मूल्यमापन केले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.
शापोरा नदीच्या तोंडाजवळील वाळूच्या संचयामुळे उथळ भागात जलवाहतुकीस धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे, असे बंदर कप्तान खात्याचे म्हणणे आहे. यासाठी त्यांनी गाळ काढण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. गाळ उपसण्याचे काम यापूर्वी २०११-१२ आणि नंतर २०१८-१९ मध्ये करण्यात आले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.