Ashish Nehra Dainik Gomantak
गोवा

Ashish Nehra: कायद्यापुढं नमला क्रिकेटपटू आशिष नेहरा; गोव्यात असलेल्या मालमत्तेतील अतिक्रमण अखेर हटवले

Goa Coastal Management Authority: केळशीतील मालमत्तेत जाण्‍यासाठी सीआरझेड कायद्याचा भंग करुन रस्‍ता बांधल्‍याप्रकरणी त्‍याला प्राधिकरणाने कारणे दाखवा नाेटीस जारी केली हाेती.

Manish Jadhav

मडगाव: भारतीय क्रिकेटपटू आशिष नेहरा याला गोवा किनारपट्टी व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाकडून दिलासा मिळाला आहे. नेहरा याच्‍या केळशीतील मालमत्तेत जाण्‍यासाठी सीआरझेड कायद्याचा भंग करुन रस्‍ता बांधल्‍याप्रकरणी त्‍याला प्राधिकरणाने कारणे दाखवा नाेटीस जारी केली हाेती. मात्र, हे अतिक्रमण हटवल्‍याने प्राधिकरणाने ही नोटीस मागे घेतली.

आशिष नेहरा याने दक्षिण गोव्‍यातील (South Goa) केळशी किनाऱ्यावर एक मालमत्ता विकत घेतली असून या मालमत्तेत जाण्‍यासाठी रस्‍ता तयार करण्‍यात आला होता. सीआरझेड कायद्याचे उल्‍लंघन करून हा रस्‍ता बांधल्‍याचे वृत्त प्रसिद्ध झाल्‍यानंतर प्राधिकरणाने या प्रकरणाची स्‍वत:हून दखल घेताना पाहणी केली हाेती. प्राधिकरणाच्‍या अभियंत्‍याने केलेल्‍या तपासणीत हे बांधकाम करताना सीआरझेड कायद्याचा भंग केल्‍याचे स्‍पष्‍टपणे म्‍हटले हाेते.

मागच्‍या आठवड्यात या प्रकरणी प्राधिकरणासमोर सुनावणी झाली असताना नेहरा यांच्‍या वकिलाने आपल्‍या अशिलाच्‍या मालकीच्‍या जमिनीत जे बांधकाम केले होते ते हटविले आहे असे सांगितल्‍यावर प्राधिकरणाने हा दावा ग्राह्य धरताना ही नोटीस मागे घेण्‍याचा निर्णय घेतला. मात्र यापुढे असे उल्‍लंघन झाल्‍यास त्‍याच्‍यावर कारवाई करण्‍यात येणार असल्‍याचा इशारा दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT