LOP Yuri Alemao And CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

‘तुम्ही चुकलात हे मान्य करा’, मुख्यमंत्री, सभापती, मंत्री ढवळीकरांनी घेतला LOP युरी आलेमाव यांचा क्लास

Yuri Alemao: सभागृहात बोलत असताना सभापतींना उद्देशून मुद्दा मांडावा, कोणीही वैयक्तिक टीका करु नये, असे आवाहन मुख्यमंत्री सावंत यांनी विरोधकांसह सत्ताधारी आमदारांना केले.

Pramod Yadav

पर्वरी: गेल्या आठवड्यात सभागृहात घडलेल्या प्रकारावरुन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सभागृहाचे पावित्र्य राखण्याचे आवाहन सर्व सदस्यांना केले. सभापतींवर कागद भिरकावणे यासारखे प्रकार योग्य नसल्याचे त्यांनी नमूद केले. सभपती तवडकरांनी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांना तुम्ही केलेला व्यवहार योग्य नसल्याचे मान्य करा असे सुनावले. तसेच, ढवळीकरांनी देखील आलेमाव यांचा यावेळी क्लास घेतला.

राज्यातील नागरिकांनी निवडून दिलेले आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, विविध कायदे करण्यासाठी आम्ही या कायदेमंडळात येत असतो. सभागृहात विविध चर्चा होतात. हे होत असताना सभागृहाचे नियम आणि शिस्त पाळण्याची गरज आहे, त्यासाठी सर्वांना सभागृह नियमांचे पुस्तक वाचणे गरजेचे आहे. सभागृहात बोलत असताना सभापतींना उद्देशून मुद्दा मांडावा, कोणीही वैयक्तिक टीका करु नये, असे आवाहन मुख्यमंत्री सावंत यांनी विरोधकांसह सत्ताधारी आमदारांना केले.

सभापतींना अरे – तुरे भाषेत बोलू नये, संसदीय कामकाजाचा हवा तेवढा विरोध करावा. सभापतींवर पुस्तक फेकून मारणे योग्य नाही, असा उल्लेख सावंत यांनी आलेमाव यांचे नाव न घेता केला.

यावेळी युरी आलेमाव यांनी देखील मुख्यमंत्री सभागृहात डोळे मारतात ते देखील बंद झाले पाहिजे अशी मागणी. सभापतींनी मुख्यमंत्री कोणाला डोळे मारतात, अशी विचारणा केली. तसेच, आलेमाव यांनी सभागृहात केलेली कृती देखील योग्य नसल्याचे नमूद केले.

"सभागृहात गेल्या आठवड्यात झालेली घटना योग्य नव्हती, हे तुम्ही मान्य करायला हवे," असे सभापती आलेमाव यांना म्हणाले. टेबलवरील पुस्तकं उचलून भिरकावणे लोकशाहीला धरुन नसल्याचे देखील सभापती तवडकरांनी आलेमाव यांना सुनावले.

मंत्री सुदीन ढवळीकरांनी देखील यावेळी आलेमाव यांचा क्लास घेतला. "२५ वर्षापासून मी या सभागृहात आहे, आलेमाव यांचे काका आणि वडील दोघेही सभागृहात होते पण, त्यांना कधीच असे कृत्य केले नाही," असे ढवळीकरांनी सांगितले.

युरी खूप शिकलेले आहेत, त्यांना या सभागृहात खूप मोठे भविष्य आहे. त्यांनी ते सिद्ध करायला हवे, असा सल्ला ढवळीकरांनी दिला. तर, विरोधी पक्षनेता म्हणून विरोधकांना वेळ मिळावा तसेच त्यांचे मुद्दे मांडले जावेत यासाठी आवाज उठवणे माझे काम असल्याचे आलेमाव म्हणाले.

वीरेश बोरकरांच्या यांच्या पोगो या खासगी ठरावावरुन सभागृहात गोंधळ झाला होता. विरोधी पक्षातील आमदारांना सभापतींच्या हौदात जात निदर्शने केली होती. यावेळी आक्रमक झालेल्या युरींना रात्रपत्र फाडत वर भिरकावले होते तसेच, टेबलवरील पुस्तके सभपतींच्या दिशेने भिरकावली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबूज: ...आणि युरीचे दोन्ही समर्थक खुश झाले

Goa Politics: आरजीचे राजकीय भविष्य काय? पक्षावर कोणाचा ताबा? वीरेश बोरकरांनी शिस्तपालन समिती नेमली अन्...

Bike Stunt Viral Video: रीलच्या नादात मोडली हाडं! पठ्ठ्याच्या स्टंटबाजीचा थरारक व्हिडिओ व्हायरल; संताप व्यक्त करत नेटकरी म्हणाले, "हा याच लायकीचा होता...''

Goa Politics: गोव्यात सरकारी कार्यक्रमांच्या नावाखाली जनतेच्या पैशांची लूट? क्रीडा खात्याच्या संचालकांना घेतलं फैलावर; काँग्रेस आक्रमक

Goa Pocso Case: मुलीने कोर्टात फिरवली साक्ष! रागाच्या भरात वडिलांविरोधात खोटी तक्रार केली; 38 वर्षीय नेपाळी नागरिकाची निर्दोष मुक्तता

SCROLL FOR NEXT