CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Worms In Mid Day Meal: 'माध्यान्ह आहार' प्रकरणाची CM कडून दखल; 'हलगर्जीपणावर कठोर कारवाई करणार...'

या घटनेनंतर एकच खळबळ माजली असून या प्रकारामुळे पालकांमध्ये तीव्र नाराजी पसरली

Ganeshprasad Gogate

Worms In Mid Day Meal सावईवेरे, वळवई व केरी भागातील शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या माध्यान्ह आहारात चक्क अळ्या आढळल्याची घटना आज बुधवारी घडली. या घटनेनंतर एकच खळबळ माजली असून या प्रकारामुळे पालकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या घटनेविषयी राज्याचे मुख्यमंत्री यांनी संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

एका स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय. ''दोषींची तातडीने चौकशी सुरु केली असून संबंधित विभागानेही याची गंभीर दखल घेतली असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.

या घटनेत ज्यांच्याकडून हलगर्जीपणा झालाय त्यांच्यावर जास्तीतजास्त कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही सावंत म्हणाले. दरम्यान या धक्कादायक प्रकारची राज्य सरकारच्या अन्न व औषध प्रशासन संचालनालयाने त्वरित दखल घेतलीय.

अन्न व औषध प्रशासन संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी अळ्या सापडलेल्या माध्यान्ह आहाराचे नमुने घेतले असून ते तपासासाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत.

सुदैवाने माध्यान्ह आहार घेतलेल्या मुलांना कोणतीही बाधा झाली नसल्याचे शिक्षण खात्याचे संचालक शैलेश झिंगडे यांनी सांगितले. तसेच त्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत यासंबंधीचा पूर्ण अहवाल संबंधित अधिकाऱ्यांकडून मागवला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: याला म्हणतात खरी जिद्द! हात नसतानाही पायाने बाईक चालवून त्याने नियतीलाच आव्हान दिलं, पठ्ठ्याचा जोश पाहून सर्वच हैराण

FDA Goa Raid: एफडीएची मोठी कारवाई! पर्वरीत 700 किलो 'बनावट' पनीर जप्त; अवैध रिपॅकेजिंगचा पर्दाफाश VIDEO

Ironman 70.3 Goa India: गोव्यात रविवारी रंगणार आयर्नमॅन स्पर्धेचा थरार; 31 देशातील 1,300 स्पर्धक घेणार सहभाग

Indonesia Mosque Blast: जकार्ता हादरले! मशिदीत मोठा स्फोट, 50 हून अधिक जखमी; संशयास्पद वस्तू सापडल्याने वाढली चिंता VIDEO

विषारी इंजेक्शन देऊन 10 जणांची केली हत्या, 27 जणांना मारण्याचा केला प्रयत्न, 'सीरिअल किलर' नर्सला ठोठावली जन्मठेपेची शिक्षा; काय नेमकं प्रकरण?

SCROLL FOR NEXT