Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: 'परकीय शक्तींच्या मदतीने देशात अराजकता माजवण्याचा प्रयत्न'; CM सावंत यांचा विरोधकांवर आरोप

Pramod Sawant Statement: देशावर आणीबाणी लादणाऱ्या आणि घराणेशाहीचे राजकारण करणाऱ्या काँग्रेसकडून आज लोकशाहीच्या नावाखाली संभ्रम निर्माण केला जात आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: देशावर आणीबाणी लादणाऱ्या आणि घराणेशाहीचे राजकारण करणाऱ्या काँग्रेसकडून आज लोकशाहीच्या नावाखाली संभ्रम निर्माण केला जात आहे. देशात अराजकता आणि झुंडशाही निर्माण करण्याचे प्रयत्न हाणून पाडणे आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश सुरक्षित आहे आणि जनता त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

पणजीत ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रेला संबोधित करताना मुख्‍यमंत्री बोलत होते. ते म्‍हणाले, नेपाळ आणि बांगलादेशातील सत्तापालटाच्या घटनांप्रमाणे परकीय शक्तींच्या सहकार्याने भारतातही अराजकता माजविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ते हाणून पाडण्‍यासाठी एकजुटीने प्रयत्‍न करणे गरजेचे आहे.

निवडणुकीत पराभव झाल्यानंतर विरोधकांकडून ईव्हीएमवर आक्षेप घेतले जातात; मात्र विजय मिळाल्यावर त्याच ईव्हीएमचा स्वीकार केला जातो, अशी दुहेरी भूमिका घेतली जात असल्याची टीका मुख्‍यमंत्र्यांनी केली. गोव्यात नगरपालिका आणि जिल्हा पंचायत निवडणुका मतपत्रिकेद्वारे झाल्या, तरी भाजपचा विजय झाल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत, सहकारमंत्री सुभाष शिरोडकर, मत्स्यसंपदामंत्री नीळकंठ हळर्णकर, महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात, कृषिमंत्री संकल्प आमोणकर, आमदार डॉ. दिव्‍या राणे, दिलायला लोबो, राजेश फळदेसाई, रुडॉल्‍फ फर्नांडिस, प्रेमेंद्र शेट, डॉ. चंद्रकांत शेट्ये, मायकल लोबो, माजी खासदार नरेंद्र सावईकर, विनय तेंडुलकर आणि अन्‍य मान्‍यवरांची उपस्‍थिती होती.

भारतात अराजकता माजविण्याचे विरोधकांचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत, असा विश्वास आमदार मायकल लोबो यांनी व्यक्त केला. विरोधकांनी न्यायालयावर मोर्चा नेण्याचा प्रयत्न केला असून, परकीय शक्तीही त्यांच्यासोबत असल्याचा आरोप त्यांनी केला.

न्यायपालिका, निवडणूक आयोगावरील टीका अयोग्‍य : श्रीपाद

सरकारच्या चुकीच्या निर्णयांना विरोधी पक्षांनी विरोध करणे अपेक्षित आहे; मात्र स्वार्थासाठी परकीय शक्तींच्या सहकार्याने देशविरोधी कार्य करणे योग्य नाही, असे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक म्हणाले. न्यायपालिका आणि निवडणूक आयोगावर टीका केली जात असून, ‘एसआयआर’बाबत संभ्रम पसरविला जात आहे. अशा प्रकारांविरोधात जनतेने खंबीरपणे उभे राहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

आझाद मैदानावरील घोषणांवर आक्षेप

पणजीतील आझाद मैदानावर यापूर्वी काही जणांनी ‘आझादी’च्या घोषणा दिल्या होत्या. त्यांना नेमकी कोणती आझादी हवी आहे? गोमंतकीय युवकांना एखाद्या विषयावर न्याय मागण्यासाठी आझाद मैदानावर येण्यास कोणीही रोखणार नाही; मात्र बाहेरील शक्तींनी तोंडाला कपडे बांधून तेथे घोषणा देणे मान्य केले जाणार नाही, असा इशारा मुख्‍यमंत्र्यांनी दिला.

परकीय शक्तींकडून अराजकता माजवण्‍याचा प्रयत्न : विश्‍‍वजीत राणे

काँग्रेस आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप आराेग्‍यमंत्री विश्वजीत राणे यांनी केला. देशात अराजकता निर्माण करण्यासाठी परकीय शक्तींची मदत घेतली जात असल्याचे ते म्हणाले. काँग्रेसच्‍या ‘राखण’ यात्रेकडे जनतेने पाठ फिरवली. त्यामुळे देशात अराजकता माजविण्याचे षड्‌यंत्र रचणाऱ्यांविरोधात भाजप कार्यकर्त्यांनी लढा देण्याची गरज असल्याचे त्‍यांनी सांगितले.

‘आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा’ संकल्प : दामू

भाजपविरोधात काँग्रेसने जनतेमध्ये कितीही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तरी तो यशस्वी होणार नाही, असे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले. भाजप लोकशाही मानणारा पक्ष असून, विरोधकांना राज्यातील विकासकामे खुपत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली ‘आत्मनिर्भर भारत व स्वयंपूर्ण गोवा’ हा संकल्प पूर्ण करण्यासाठी पक्ष प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Government Decision: गोव्यात दुकाने, मॉल्स आता 24 तास सुरू राहणार! सरकारचा मोठा निर्णय; 3 वर्षांसाठी परवानगी

भारताने तुर्कीची केली बोलती बंद! आंतरराष्ट्रीय मंचावर पोलखोल करत सुनावले खडे बोल; UN मधील राजनैतिक संघर्ष शिगेला VIDEO

MS Dhoni IPL Retirement: कॅप्टन कूलचा आयपीएलला अलविदा! CSK ने ‘थाला’ वर सोपवली मोठी जबाबदारी

Jeffrey Epstein Death: जेफ्री एपस्टीनचा मृत्यू आत्महत्या नव्हे, तर खून होता! 7 वर्षांनंतर फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या दाव्याने खळबळ; पाठीमागून हल्ला करुन गळा आवळल्याचा संशय

Unlucky Zodiac Sign: ग्रहांच्या उलट्या चालीने उडणार 4 राशींची झोप! नशिबाची साथ मिळण्यात येणार अडचणी; प्रत्येक कामात येऊ शकतात विघ्न

SCROLL FOR NEXT