Sanquelim Dainik Gomantak
गोवा

Sanquelim: नशामुक्त गोव्याचा निर्धार! "रात्री उशिरापर्यंत घराबाहेर राहणाऱ्या मुलांची चौकशी करा", CM सावंतांचे पालकांना आवाहन

Pramod Sawant: गोव्यात अमलीपदार्थांच्या व्यवहारांवर अमलीपदार्थ विरोधी पथक तसेच गोवा पोलिस अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

Sameer Amunekar

साखळी: गोव्यात अमलीपदार्थांच्या व्यवहारांवर अमलीपदार्थ विरोधी पथक तसेच गोवा पोलिस अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. यासाठी राज्य सरकारचा त्यांना पूर्ण पाठिंबा असून आज पालकांनीही आपल्या मुलांवर लक्ष ठेवताना रात्री उशिरापर्यंत घराबाहेर राहणाऱ्या मुलांची चौकशी करणे आवश्यक बनले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी येथे केले.

डिचोली पोलिस स्थानकाचे निरीक्षक विजय राणे यांच्या मार्गदर्शनाखाली डिचोली तालुक्यात काढण्यात आलेल्या अमलीपदार्थ विरुद्ध जागृती फेरीच्या शुभारंभप्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते.

यावेळी पोलिस निरीक्षक विजय राणे, साखळीच्या नगराध्यक्ष सिद्ध प्रभू, माजी सरपंच संजय नाईक, कृष्णा गावस, माजी नगराध्यक्ष राया पार्सेकर, पंच सदस्य नारायण गावस, दामोदर पेठकर व इतरांची उपस्थिती होती.

यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बावटा दाखवून अंमलीपदार्थ विरोधी रॅलीचा शुभारंभ केला. या रॅलीत डिचोली पोलिस उपनिरीक्षक, साहाय्यक उपनिरीक्षक, हवालदार पोलीस कॉन्स्टेबल असे कर्मचारी सहभागी झाले होते.

साखळी हाऊसिंग बोर्ड येथून सुरू झालेली ही रॅली साखळी शहरात फिरून सर्वण कारापूरमार्गेडिचोली शहरात दाखल झाली. तिथे शहरात फिरल्यानंतर मुळगाव नागदेवता येथून पुन्हा डिचोली पोलीस स्थानकात जवळ येऊन त्याची सांगता झाली.

आमिषांना बळी पडू नका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नशामुक्त भारतप्रमाणेच ‘नशामुक्त गोवा’ ही मोहीम गोवा सरकार हाती घेणार आहे. त्यात पालक व लोकांनीही सहभागी व्हावे. कोणतेही पार्सल एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी नेऊन देण्यासाठी कोणी जर पैसे देत असेल तर अशा आमिषांना युवकांनी बळी पडू नये.

स्वतःचा व इतरांचाही जीव सुरक्षित ठेवण्यासाठी अशा प्रकारांमध्ये गुतलेल्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: मुंगूल गोळीबार प्रकरण; प्राथमिक तपासात दोन टोळ्यांमधील गोळी युद्ध असल्याचे स्पष्ट

Stray Dog Bytes: फोंड्यात भटक्या कुत्र्यांनी 5 जणांचे घेतले चावे! लोक भयभीत; महिन्याकाठी 100 जणांवर हल्ला

Goa Crime: सावधान! तोतया अधिकारी लुबाडतोय; ‘प्रदूषण’ मंडळाचे नाव सांगून लाखोंचा गंडा, पोलिस तक्रार करूनही कारवाई नाही

Goa University: ‘पेपरलीक’चा तपासणी अहवाल माध्यमांकडे गेला कसा? ‘विद्यापीठ टिचर्स’ने उघडले तोंड; चौकशीची केली मागणी

Bhausaheb Bandodkar: ..भाऊसाहेबांना फक्त 10 वर्षेच मिळाली, पण त्यांनी गोव्याच्या राजकारणाला नवी दिशा दिली; पुण्यतिथी विशेष

SCROLL FOR NEXT