Goa CM Pramod Sawant Goa CM X Handle
गोवा

'माझे घर' योजनेचा लाभ घ्या; मुख्यमंत्री सावंतांचे गोमंतकीयांना आवाहन, 1972 पूर्वीची घरे नियमित होणार

Goa News: १९७२ पूर्वी कोमुनिदाद किंवा सरकारी जागेत उभारण्यात आलेल्या घरांची सनद किंवा इतर कागदपत्रे लोकांनी तयार करून ठेवावी.

गोमंतक ऑनलाईन टीम

साखळी: राज्य सरकारने विधानसभा अधिवेशनात मंजूर केलेल्या 'माझे घर' या कायद्यामुळे १९७२च्या पूर्वीची सर्व घरे नियमित होणार आहेत. हा कायदा गोव्याच्या भावी पिढीला तसेच त्यांच्या घरांना संरक्षण देणारा ऐतिहासिक असाच आहे. येत्या सप्टेंबर महिन्यानंतर या योजनेचे अर्ज ग्रामपंचायती, नगरपालिकांमध्ये उपलब्ध करण्यात येतील. लोकांनी आपल्या घरांची आवश्यक कागदपत्रे तयार करून या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पाळी येथे केले.

येत्या १० सप्टेंबरनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गोव्यात येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत ताळगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर हा सोहळा होईल. १९७२ पूर्वी कोमुनिदाद किंवा सरकारी जागेत उभारण्यात आलेल्या घरांची सनद किंवा इतर कागदपत्रे लोकांनी तयार करून ठेवावी. यापुढे पंचायत सचिव व बीडिओ यांना हे अतिरिक्त काम करून लोकांना त्यांच्या घरांच्या प्रमाणपत्रे देण्याची प्रक्रिया हाती घ्यायची आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

अनेक लोकांचा असा भ्रम असतो की आपण आपल्या जागेतच बेकायदेशीरपणे घरांचे केलेले विस्तारीकरणाचे काम कोण मोडणार? परंतु कोणीही यासंदर्भात तक्रार केल्यास संपूर्ण घरच जमीनदोस्त करण्याचा आदेश उच्च न्यायालय देते. त्यासाठीच १९७२ पूर्वी कोमुनिदाद सरकारी जागेत बांधलेल्या, तसेच आपल्याच जागेत अवैधरित्या विस्तारिकरण केलेल्या अनियमित घरांना नियमित करण्यासाठी या योजनेचा लाभ घ्यावा, असे मुख्यमंत्री म्हणाले.

ग्रामस्थांचे सहकार्य लाभले तर विकास शक्य

कोठंबी हा आपला गाव असून पाळी-कोळंबी ही आमचीच पंचायत आहे. या पंचायतीत आपण दहावीनंतर निवासी दाखला नेण्यासाठी आलो होतो, त्यावेळी होती तशीच स्थिती पंचायतीची होती. अत्यंत जर्जर बनलेली ही पंचायत जागेसंदर्भात तांत्रिक अडचण असल्याने नव्याने उभारू शकत नव्हतो, ही आपणास खंत होती.

परंतु आज सर्वांनी मोलाचे सहकार्य केल्याने सुमारे पाच कोटी खर्चुन प्रशस्त अशी पंचायत इमारत उभारणे शक्य होत आहे. गावातील लोकांनी सरकारतर्फे होऊ घातलेल्या विकासाला सकारात्मक सहकार्य केले तर कोणतेही प्रकल्प येण्यास वेळ लागत नाहीत, याचे हे एक उत्तम उदाहरण आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Super Cup 2025: जल्लोष! FC Goa सुपरडुपर हिट; सलग दुसऱ्यांदा जिंकला कप, अनेक विक्रमांना गवसणी

Arpora: ‘रोमियो लेन’बाबत धक्कादायक माहिती! 15 दिवसांत बांधकाम पाडण्याचा दिला होता आदेश; आगीस पंचायत खाते, CZMA जबाबदार

आग भडकली, धावपळ सुरु झाली, 40 सेकंदात सर्व काही संपले! हडफडे दुर्घटनेप्रकरणी तिघे निलंबित; मालकाच्या अटकेसाठी पोलीस दिल्लीत

Partgali Math: सुमारे 1000 वर्षांपूर्वी सारस्वत ब्राह्मण गोव्यात आले, 550 वर्षांपूर्वी वैष्णवांनी पर्तगाळीत मठ बांधला..

Horoscope: आजचा दिवस तुमच्यासाठी खास! 'या' राशींना मिळणार भाग्याची साथ, वाचा तुमचे भविष्य!

SCROLL FOR NEXT