Goa Wari CM Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

गोमन्तक डिजिटल टीम

न्हावेली येथील श्री लक्ष्मीनारायण कला व सांस्कृतिक माऊली वारकरी मंडळातर्फे काढण्यात आलेल्या पंढरपूर पायी वारीचे गुरुवारी प्रस्थान झाले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उपस्थित राहून या वारीला निरोप दिला. मुख्यमंत्र्यांनी गळ्यात वीणा घालून काही अंतर वारीत चालून सेवा बजावली.

या वारीचे हे तिसरे वर्ष असून एकूण १३९ वारकरी या वारीत सहभागी झालेले आहेत. १२ दिवस पायी चालत प्रवास हे वारकरी करणार असून १५ जुलै रोजी पंढरपूरला दखल होणार आहेत. १७ रोजी आषाढी एकादशी झाल्यानंतर १८ रोजी हे वारकरी पुन्हा गोव्यात दाखल होणार आहे. दिवसाला ३० ते ३५ कि. मी. अंतर हे वारकरी कापणार आहेत.

या वारकरी मंडळाचे अध्यक्ष महादेव गावस यांनी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य गोपाळ सुर्लकर, सरपंच कालिदास गावस, पंचसदस्य नाईक व इतरांची उपस्थिती होती.

वारीची परंपरा कायम ठेवा

गोव्यात सुरू झालेली वारीची परंपरा आजही मोठ्या दिमाखात सुरूच आहे. दरवर्षी वाऱ्या आणि वारकरी वाढतच चालले आहेत. त्यावरून लोकांची आपल्या संस्कृतीकडे असलेली ओढ दिसून येत आहे. ही परंपरा प्रत्येकाने कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: ख्रिस्ती समाजाच्या मोर्चाचा वाहतुकीला फटका; अनेकांची गैरसोय

Saint Francis Xavier: संत फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांच्या DNA चाचणी मागणीवरून गोव्यात वाद का पेटला?

Goa Crime: लग्नाचे आमिष देवून अत्याचार करणाऱ्या ओडिशातील तरुणाचा कोर्टाने फेटाळला जामीन!

गोव्यात गेल्या दहा वर्षात सर्वाधिक 'वृक्षसंहार', शेतजमिनींचादेखील ऱ्हास; केंद्रीय अहवालातून खुलासा!

SCROLL FOR NEXT