Goa CM Pramod Sawant Support One Nation One Election 
गोवा

गोव्यात लोकसभेसोबत विधानसभा निवडणूक घेतली तरी भाजप तयार, वन नेशन वन इलेक्शनचे सावंतांकडून समर्थन

राज्य आणि देशाच्या प्रगतीसाठी केंद्र सरकारची वन नेशन वन इलेक्शन संकल्पना सत्यात उतरणे आवश्यक

Pramod Yadav

Goa CM Pramod Sawant Support One Nation One Election: वन नेशन वन इलेक्शन काळाची गरज आहे असे म्हणत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या संकल्पनेचे समर्थन केले आहे. तसेच, गोव्यात येत्या लोकसभा निवडणुकीसोबत विधानसभा निवडणूक झाली तरी भाजप तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत मध्यप्रदेश मध्ये असताना त्यांनी एका पत्रकार परिषदेत याबाबत त्यांनी वक्तव्य केले आहे.

मुख्यमंत्री सावंत यांना ग्वालेहर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत वन नेशन वन इलेक्शन बाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी या संकल्पनेचे समर्थन करत विविध राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुका यामुळे देशाच्या प्रगतीवर परिणाम होत आहे.

राज्य आणि देशाच्या प्रगतीसाठी केंद्र सरकारची वन नेशन वन इलेक्शन संकल्पना सत्यात उतरणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात अंत्योदय तत्वावर काम करत आहे. आम्ही देखील गोव्यात याच तत्वावर काम करत आहे. असे सावंत म्हणाले.

विरोधकांवर टीका

इंदूर, मध्यप्रदेश येथे भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेत सनातन धर्माचा मुद्दा उपस्थित करत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी I.N.D.I.A. आघाडीवर जोरदार टीका केली.

'यूपीएवरुन नाव बदलून I.N.D.I.A. आघाडीने ज्या प्रकारे सनातन धर्माविरोधात अपशब्द वापरले आहेत, तो हिंदू धर्माचा अपमान आहे. पोर्तुगीज, मुघल आणि इंग्रज गोव्यात जे काम शतकानुशतके करू शकले नाहीत, ते काम I.N.D.I.A वाले करु पाहत आहेत.' अशा शब्दात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विरोधकांवर टीका केली.

धर्मांतराचा अजेंडा घेऊन पोर्तुगीज भारतात आले होते, पण तेही काही करू शकले नाहीत तिथे I.N.D.I.A. आघाडीला ते शक्य नाही. असे सावंत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

SCROLL FOR NEXT