Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa CM Pramod Sawant: कर्नाटकात लय जबरा फसले सीएम सावंत; अचानक हॉटेलची लिफ्ट बंद झाल्यानं उडाली भांबेरी

CM Pramod Sawant: राज्याचे (गोवा) मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.

Manish Jadhav

Lok Sabha Elections 2024: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने पुन्हा एकदा सत्तेत येण्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावली आहे. याचदरम्यान, राज्याचे (गोवा) मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते लिफ्टमध्ये फसल्याचे दिसत आहेत. अचानक लिफ्ट बंद झाल्याने ते अडकले असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री प्रमोद सावंत कर्नाटक दौऱ्यावर असताना त्यांच्यावर हा प्रसंग ओढावला. मुख्यमंत्री सावंत कर्नाटकातील मंड्या येथील हॉटेलमध्ये मुक्कामाला असताना ही घटना घडली. यानंतर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्यांना लिफ्टमधून बाहेर काढले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत कर्नाटकातील भाजप-जेडीएस युतीचे उमेदवार एच. डी. कुमारस्वामी यांचा अर्ज भरण्यासाठी गेले होते.

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यासाठी येत्या 19 एप्रिल रोजी मतदान होत आहे. यासाठी आज (दि.04) अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे. कर्नाटकात 28 जागांसाठी दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची लगबग सुरु झाली असून, कर्नाटकातील भाजप-जेडीएस युतीचे उमेदवार एच. डी. कुमारस्वामी यांनी मंड्या मंतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस, येडियुरप्पा आणि तेजस्वी सूर्या हजर होते. मुख्यमंत्री सावंत यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी पंतप्रधान एडी देवेगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप कर्नाटकमध्ये सर्व 28 जागा जिंकेल असा, विश्वास मुख्यमंत्री सावंत यांनी यावेळी व्यक्त केला.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत आज (दि.04) सकाळी कर्नाटकमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांचे बंगळुरुचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी स्वागत केले. सावंत यांनी तेजस्वी सूर्या यांच्यासोबत डोश्यावर ताव मारला. याचे फोटो देखील सावंत यांनी शेअर केले आहेत. कर्नाटकमध्ये 28 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. 26 एप्रिल रोजी राज्यातील विविध मतदारसंघासाठी मतदान होईल तर, सात मे रोजी उरलेल्या मतदारसंघासाठी मतदान होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT