पाडी - केपेत शनिवारी (१६ मार्च) काजुबिया वाहून नेणारा ट्रक दरीत कोसळून भीषण अपघात झाला. अपघात झाल्याचे समजताच काणकोण महामार्गावरुन जाणारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ताफा थांबवून अपघातग्रस्तांना मदत करण्यास सुरुवात केली.
अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली असून, 13 जणांना वाचवण्यात यश आले आहे. यामध्ये पाच लहान मुले, पाच पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे.
अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक लोक घटनास्थळी जमा झाले होते. रुग्णवाहिका बोलावून जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आले. आता प्रमोद सावंत यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यावेळी त्यांच्यासोबत समाजकल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई देखील उपस्थित होते.
मुख्यमंत्री सावंत दक्षिण गोव्यातील कुंकळ्ळी येथे विकास भारत संकल्प यात्रेला संबोधित करून परतत होते, असे सांगण्यात येत आहे. तेव्हा वाटेत हा अपघात दिसल्यानंतर त्यांनी आपला ताफा थांबवला.
पाडी-केपेत काजुबिया वाहून नेणारा ट्रक दरीत कोसळला, याती 13 प्रवाशांना वचवण्यात यश आले असून, एक महिला प्रवासी गंभीर आहे. जखमी प्रवाशांमध्ये पाच लहान मुलांचा देखील समावेश आहे.
रात्रीच्या वेळेस झालेल्या अपघात ठिकाणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह समाजकल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी देखील धाव घेत बचावकार्यात मदत केली. सर्व जखमींवर बांबोळीतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.