Operation Sindoor Dainik Gomantak
गोवा

Goa CM: ऑपरेशन सिंदूर यशस्वी! देशातील देशद्रोह्यांना जागा दाखवण्याची गरज; मुख्यमंत्री प्रमोद सावंत

Goa CM Pramod Sawant: देशाचे शत्रू हे केवळ देशाबाहेर नाहीत, तर काही शत्रू देशाच्या आत देखील लपून बसलेले आहेत, ज्यांना शोधण्याची आणि त्यांची जागा दाखवून देण्याची गरज निर्माण झालीये.

Akshata Chhatre

डिचोली: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी डिचोलीत प्रशासकीय ब्लॉक प्रकल्पाची पायाभरणी केली. डिचोली येथे होऊ घातलेला हा प्रकल्प 80 कोटींचा आहे. सोमवारी (दि. 12) झालेल्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सध्या सुरू असलेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीवर वक्तव्य केले. उपस्थितांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की देशाचे शत्रू हे केवळ देशाबाहेर नाहीत, तर काही शत्रू देशाच्या आत देखील लपून बसलेले आहेत, ज्यांना शोधण्याची आणि त्यांची जागा दाखवून देण्याची गरज निर्माण झालीये.

देशद्रोह्यांना जागा दाखवून देण्याची गरज

दहशतवादाच्या विरोधात भारताने सुरू केलेल्या या मोहिमेत भारत देशाने संपूर्ण जगाला त्याची शक्ति दाखवून दिली आहे आणि हे पाहता येणाऱ्या काही कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विकसित भारताचं स्वप्न देखील पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. या युद्धजन्य परिस्थितीत भारताच्या पाच जवानांना वीर मरण आले, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी देशासाठी जिवावर उदार होऊन सीमेवर गेलेल्या आणि वीर मरण आलेल्या शहिदांना आदरांजली वाहिली.

सध्या भारताने देशाबाहेरील शत्रूंना आपली शक्ति दाखवून दिली आहे, मात्र काही देशद्रोही हे देशात लपून बसलेत आणि त्यांना वेळेतच त्यांची जागा दाखवून देण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले आहेत.

भारत कायमच सर्वधर्म समभाव यावर लक्ष केंद्रित करून काम करतोय. गोवा देखील सर्व धर्म समभावाचे तंतोतंत पालन करत आलाय. गोव्यात हिंदू, मुस्लिम किंवा ख्रिश्चन आशा तिन्ही समाजातील लोकांना समान वागणूक दिली गेलीये, प्रत्येक धर्माचा आदार केला गेलाय आणि हेच कायम राहील असं मुख्यमंत्री म्हणलेत.

'ह्या' जमिनींवरील घरे कायदेशीर करण्यासाठी लवकरच कायदा!

खासगी, कोमुनिदाद आणि आल्वारा जमिनीतील घरे कायदेशीर करण्यासाठी लवकरच कायदा आणला जाईल. आम्हाला कोणाचाही घरे मोडायची अजिबात इच्छा नाही. कोर्टाच्या आदेशामुळे घरांवर कारवाई करावी लागत असल्याचं मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत म्हणाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT