CM Pramod Sawant:  Dainik Gomantak
गोवा

गोवा बनणार सर्व गावांमध्ये बँक असलेले राज्य; बँक नसलेल्या 5 गावांमध्ये इंडिया पोस्ट सुरू करणार शाखा

मुख्यमंत्र्यांची माहिती; लवकरच राज्यात आणखी पाच खनिज ब्लॉकचा लिलाव

Akshay Nirmale

CM Pramod Sawant: आमच्या सुंदर गोव्यातील पाच गावे बँकमुक्त होती. इंडिया पोस्ट बँकेच्या माध्यमातून या पाच गावांमध्येही आता बँकेची शाखा सुरू होणार आहे.

त्यामुळे सर्व गावांमध्ये बँकिंग सुविधा मिळणारे गोवा हे कदाचित राज्यातील पहिले राज्य बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.

गोव्यातील सोनाळ, साट्रे, करंझोळ, गोकुल, कावरे या पाच गावांमध्ये इंडिया पोस्ट बँक शाखा सुरू करणार आहे. अहमदाबाद येथे झालेल्या 26 व्या पश्चिम विभागीय परिषदेच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली.

सावंत म्हणाले की, गोवा हे सर्व आर्थिक आणि सामाजिक बाबींमध्ये प्रगतीशील राज्य आहे. मात्र, माझ्या सुंदर राज्यातील पाच गावे बँकमुक्त होती. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या निर्देशानुसार, राज्य सरकारने सर्व गावांना बँकिंग सुविधा मिळतील याची खात्री केली.

आता, इंडिया पोस्टने राज्यातील पाच गावांमध्ये बँकिंग शाखा आणि पोस्ट ऑफिस उघडण्याचा निर्णय घेतला आहे.

सोनाळ, साट्रे, करंझोळ, गोकुल, कावरे ही ती गावे आहेत. त्यामुळे प्रत्येक गावात बँकिंग सुविधा असणारे गोवा कदाचित देशातील पहिले राज्य बनेल.”

मुख्यमंत्री म्हणाले की, आणखी पाच खनिज ब्लॉक्सच्या लिलावासाठी निविदा मागवणाऱ्या सूचना लवकरच जारी केल्या जातील.

जास्तीत जास्त क्षमता साध्य करण्यासाठी गोवा सरकार नियमित अंतराने लोह खनिज ब्लॉक्सचा लिलाव करेल.

हा राज्यासाठी उपजीविकेचा आणि उत्पन्नाचा एक मोठा स्रोत आहे कारण आम्हाला यातून सुमारे 1,000 कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे.

राज्य सरकारने 2022 पासून आजपर्यंत नऊ लोह खनिज खाण ब्लॉक्सचा लिलाव केला आहे.

केंद्र पुरस्कृत विविध योजनांतर्गत अधिकाधिक निधी आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 2,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या 72 योजनांशी संबंधित सविस्तर प्रकल्प अहवाल केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांसमोर सादर केला जात आहे,” असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi Goa Speech: 'गोवा बनले भ्रष्टाचाराचे केंद्र', राहुल गांधींचा भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल; खाणकाम, जमीन आणि बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर

Mhadei River Dispute: म्हादईप्रश्नी राहुल गांधींचे मौन! गोव्याच्या हिताला डावलून कर्नाटकाची पाठराखण केल्याचा गोमंतकीयांचा आरोप; राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा

Horoscope 19 October 2026: सुवर्णयोग आणि धनलाभाचा दिवस! शारदीय नवरात्रीच्या सोमवारी 'या' राशींचे उजळणार नशीब; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस?

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

SCROLL FOR NEXT