CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa Rape Case: मी सुद्धा 14 वर्षांच्या मुलीचा बाप आहे

एक जबाबदार सरकारचा प्रमुख या नात्याने मला या दुर्दैवी घटनेबाबत खूप दुःख आणि त्रास झाला. मात्र माझ्या वक्तव्यांचा विपर्यास करण्यात आला.

दैनिक गोमन्तक

गोव्याचे (Goa) मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी गोव्यात सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान मुलींबद्दल एक भंपक वक्तव्य केले होते. ज्यामुळे त्यांचा प्रचंड टिकेचा सामना करावा लागला. तर काहींनी त्यांच्या मतांना समर्थन दिले. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बलात्काराच्या मुद्यावरून विचित्र विधान सभागृहात केले होते. "किशोरवयीन मुलांच्या पालकांनी त्यांचे मुलं गोवा बीच वर अंधाऱ्या रात्री काय करतात याचे परिक्षण केले पाहिजे, मुली रात्री समुद्रकिनाऱ्यावर काय करतात हे बघितले पाहिजे" गोव्यासारख्या आधूनिक आणि सुशिक्षित राज्याच्या मुख्यमंत्र्याना असे विधान करण शोभतं का असा प्रश्व उपस्थित झाला आहे. (Goa Cm Pramod Sawant Said head of responsible Government and as father of 14 year old daughter I was deeply pained)

गोव्यात सुरू असलेल्या बलात्काराच्या प्रकरणाबद्दल त्यांनी अप्रत्यक्षपणे त्या पीडित मुलींनाच दोष दिल्याचे दिसते. मात्र या मुद्दयावरून आज सावंत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. "या दुर्दैवी घटनेबाबत माझ्या विधानाचे काही नेत्यांकडून आणि जनतेनेकडून चुकीचे संदर्भ काढले गेले. एक जबाबदार सरकारचा प्रमुख या नात्याने आणि 14 वर्षांच्या मुलीचे वडील या नात्याने मला या दुर्दैवी घटनेबाबत खूप दुःख आणि त्रास झाला. दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार झालेल्या प्रकरणाबद्दल मी गंभीररित्या विचार केला. मी कायद्याद्वारे प्रदान केलेल्या सुरक्षेचा अधिकार नाकारण्याचा प्रयत्न केला नाही. विशेषत: जेव्हा महिला आणि मुलांच्या सुरक्षेची वेळ येते तेव्हा गोवा पोलिसांनी खरोखरच चांगली कामगीरी बजावली आहे. त्यांनी यापूर्वी घडलेल्या घटनेबाबत वेगाने कारवाई करून आरोपींना अटक केली आहे."

मी तुम्हाला हमी देतो की दोषींना कायद्यानुसार सर्वात कठोर शिक्षा मिळेल. गोव्याच्या नागरिकांची सुरक्षा नेहमीच आमच्या सरकारची प्राथमिकता राहीली आहे आणि या पुढेही ती कायम असेल. दरम्यान ती चुकीच्या वेळी, चुकीच्या ठिकाणी गेली नसती तर तिच्याबर बलात्कार झालाच नसता, हेच या प्रकरणातले अंतिम सत्य आहे. असेच मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरून वाटत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT