Goa Government Jobs Dainik Gomantak
गोवा

Goa Government Jobs: सरकारी नोकरीसाठी आता अनुभव गरजेचा; किमान एक वर्ष अ‍ॅप्रेंटिसशिप करावी लागणार...

सार्वजनिक सेवेत प्रभावी योगदान देण्यासाठी पाऊल

Akshay Nirmale

Experience needed in Government Jobs in Goa: गोव्यात आता कायमस्वरूपी सरकारी नोकरी हवी असेल तर उमेदवाराला किमान एका वर्षाचा कामाचा अनुभव असणे सक्तीचे असणार आहे. गुरूवारी याबाबतचा निर्णय झाला आहे.

हा कामाचा अनुभव अर्जदारांनी अ‍ॅप्रेंटिस म्हणून सरकारी विभाग, संस्था, कार्यालये किंवा निमसरकारी संस्था, कार्यालयांमध्ये हा अनुभव घेतलेला असावा.

एखाद्या कारखान्यात किंवा कंपनीतील किंवा खासगी संस्थेत जिथे पाच पेक्षा अधिक व्यक्ती कार्यरत आहेत, तेथील अनुभवही चालणार आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले की, यापुढे कायमस्वरूपी सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी युवकांना सरकारीसह कोणत्याही क्षेत्रातील कामाच्या अनुभवाचे प्रमाणपत्र लागेल. यापुर्वी सरकारी नोकरी मिळविण्यासाठी अशा अनुभवाची गरज लागत नव्हती.

पण, अनुभवासाठी युवकांना काम करावे लागेल. युवकांना सरकारी नोकरीतील कामाचे प्रत्यक्ष ज्ञान व्हावे यासाठी ही सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांची क्षमता, कौशल्ये यात वाढ होणार आहे. वास्तव जगातील कामाच्या वातावरणातून युवकांना ज्ञान मिळवायला मदत होईल.

त्याचा फायदा अर्थातच सार्वजनिक सेवेत प्रभावीपणे योगदान देण्यासाठी अधिक सुसज्ज होण्यासाठी होणार आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याच वर्षी बेरोजगार युवकांसाठी ‘ॲप्रेन्‍टीसशिप’ (प्रशिक्षणार्थी) योजना आणली. यात अनेक तरूणांनी अर्ज केले होते.

विविध सरकारी विभाग तसेच कंपन्यांमध्ये ही नोकरी असणार आहे. यात उमेदवाराच्या शिक्षणानुसार त्यााल मासिक स्टायपेंडही दिला जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT