Goa CM Pramod Sawant Addressing Press Goa CM X Handle
गोवा

Margao Crime: केअर टेकर महिलेवरील कथित बलात्कार प्रकरणाची सखोल चौकशी होणार; CM सावंत यांचे आदेश

Goa Crime News: कामाला लावण्याचे आश्वासन देत परराज्यांतून मुली आणत असल्याचा मांजरेकरवर आरोप आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: मडगाव येथील कथित बलात्कार प्रकरणी पीडितेने जबाब बदलल्याने एकूणच प्रकरणाची संपूर्ण सत्यता तपासली जाईल. पोलिसांना सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. ही मानवी तस्करीची घटना आहे का त्याचीही पूर्ण पडताळणी होईल, अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गुरुवारी (दि. २० मार्च) दिली.

याच प्रकरणात शबरीश मांजरेकर (रा. बड्डे, वय ३२) याला अटक करण्यात आली आहे. पीडित महिलेला मदतनीस (केअर टेकर) म्हणून चांगल्या पगाराची नोकरी व राहण्याची सोय उपलब्ध करून देण्याच्या बहाण्याने गोव्यात बोलावल्याचा आरोप शबरीश मांजरेकर ऊर्फ अशोक मांजरेकरवर आहे. त्यानुसार मडगाव पोलिसांनी गुरुवारी त्याला अटक केली.

मांजरेकर याने 'त्या' महिलेची फसवणूक केल्याचा तसेच कोंब येथील एका कुटुंबाकडून रक्कम घेतली पण प्रत्यक्षात त्या युवतीला दिली नाही, अशीही तक्रार आहे. परवानाधारक कंत्राटदार असल्याचे भासवून कामाला लावण्याचे आश्वासन देत परराज्यांतून मुली आणत असल्याचा मांजरेकरवर आरोप आहे, अशी माहिती दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक टिकम सिंग यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; पोलिसांचे फोन टॅपिंग?

GST Council: ‘एक देश एक कर’ला बळकटी देणे गरजेचे! दिल्लीत ‘जीएसटी’ परिषदेच्या बैठकीत CM सावंतांचे प्रतिपादन

Goa Liquor Smuggling: गोव्यातून गुजरातला दारुतस्करी! 1.43 कोटींचा मद्यसाठा जप्त; पिसुर्लेतील डिस्टिलरी सील, 9 जण अटकेत

Mapusa: पाणीपुरवठा ऑफिसमध्ये नेल्या गढूळ पाण्याच्या बाटल्या! म्हापशातील प्रश्न ऐरणीवर; काँग्रेसचा घागर मोर्चाचा इशारा

Reis Magos: रेईश मागूशमधील प्रकल्प DLF ने गुंडाळला? ‘रेरा’कडे नोंदणी मागे घेण्यासाठी अर्ज; 80 बंगल्यांची नोंदणी होणार रद्द

SCROLL FOR NEXT