Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

वायनाड भूस्खलननंतर गोव्याचे मुख्यमंत्री अलर्ट मोडवर, यंत्रणांना दिले महत्त्वाचे आदेश

Goa Assembly Monsoon Session 2024: केरळमधील निसर्गसुंदर वायनाड जिल्ह्यातील मुंडक्कई, चूरलमाला, अट्टामाला आणि नूलपुझ्झा या चार गावांमध्ये मंगळवारी पहाटे भूस्खलन झाले. या पार्श्वभूमीवर गुरुवारी गोवा विधासनभेत चर्चा झाली.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa CM Pramod Sawant On Wayanad Landslide

पणजी : वायनाड येथील भूस्खलनाच्या दुर्घटनेत १०० हून अधिक नागरिकांचा बळी गेल्यानंतर आता गोवा सरकारही अलर्ट मोडवर गेले आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विधानसभेत याबाबत माहिती दिली. वायनाडमधील दुर्घटना आपले डोळे उघडणारा प्रसंग आहे, असं म्हणत सावंतांनी प्रशासनाला भूस्खलन क्षेत्राला धक्का लागता कामा नये, असे निर्देश दिले आहेत.

गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून गुरूवारी वायनाडमधील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली. यावेळी उत्तर देताना प्रमोद सावंत म्हणाले, वायनाडमधील दुर्घटना ही आपल्या सर्वांचे डोळे उघडणारा उघडणारा प्रसंग आहे. मी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना दरडप्रवण क्षेत्राकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले आहेत. दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या भागांना आपण धक्का लावू शकत नाही.

यंत्रणांनी दरड कोसळण्याची, भूस्खलनाची शक्यता असलेल्या क्षेत्रांमधील उपाययोजनांसंदर्भात तयार केलेल्या अहवालावर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावणार आहोत
मुख्यमंत्री प्रमोद सावंत

बाबूश मोन्सेरात काय म्हणाले?

राज्यात भूस्खलन, दरड कोसळण्याच्या घटना टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने सर्व नियोजन आणि विकास विभागांसाठी दिशानिर्देश जारी केले आहेत. विकासकामांना परवानगी देताना संबंधित विभागांना उपाययोजनांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी सांगितले. तसेच अशा नैसर्गिकदृष्ट्या संवेदनशील भागांमधील उपाययोजनांमध्ये काय सुधारणा करता येतील यासाठी तज्ज्ञांची मदत घेणार आहोत, असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ro Ro Ferryboat: रो-रो फेरीबोटींच्या नावावरून गोंधळ! स्थानिक नद्यांची नावे देता आली नाहीत का? अमित पाटकर यांचा सवाल

Panaji: पणजीतील जिवंत माणसाला दाखवले 'मृत'! वीज खात्याचा भोंगळ कारभार; मंत्री ढवळीकर देणार स्पष्टीकरण

Cuncolim Revolt: 442 वर्षांपूर्वी परकीय सत्तेच्‍या विरोधात कुंकळ्‍ळीच्‍या 16 महानायकांनी दिलेला लढा आशिया खंडातील 'पहिला उठाव'

Goa Accident: कानात इअरफोन लावून चालला रुळावरून, रेल्वेने दिली धडक; झारखंडच्या तरुणाचा सांकवाळ येथे मृत्यू

Rashi Bhavishya 15 July 2025: कामातील प्रगती स्पष्ट जाणवेल, प्रेमसंबंधात गोडवा वाढेल; जाणून घ्या तुमच्या राशीचं भविष्य

SCROLL FOR NEXT