CM Pramod Sawant Health Update Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant Health Update: "मी पूर्णपणे ठणठणीत" मुख्यमंत्री प्रमोद सावंत गोव्यात दाखल, प्रकृतीबाबत दिली मोठी अपडेट

Goa CM Pramod Sawant: गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे पुण्यातील उपचार पूर्ण करून गोव्यात परतले आहेत.

Sameer Amunekar

साखळी: गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे पुण्यातील उपचार पूर्ण करून गोव्यात परतले आहेत. मुलीच्या भेटीसाठी पुण्यात गेले असताना मुख्यमंत्र्यांना अचानक प्रकृतीचा त्रास जाणवला होता. मात्र, आता ते पूर्णपणे बरे झाले असून गोव्यात पाऊल ठेवताच त्यांनी विश्रांतीऐवजी जनसेवेला प्राधान्य दिले आहे. आज सकाळी त्यांनी आपल्या साखळी मतदारसंघातील रवींद्र भवन येथे स्थानिक नागरिकांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे पुण्यात गेले असताना, गुरुवारी त्यांच्या छातीत अचानक वेदना होऊ लागल्या. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांना तातडीने पुण्यातील प्रसिद्ध 'रुबी हॉल क्लिनिक'मध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होताच त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आणि ते गोव्याला रवाना झालेत.

आरोग्याबाबतच्या अफवांना पूर्णविराम

मुख्यमंत्र्यांना रुग्णालयात दाखल केल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात त्यांच्या प्रकृतीबाबत विविध चर्चांना उधाण आले होते. मात्र, आज साखळीतील रवींद्र भवन येथे जेव्हा मुख्यमंत्री प्रत्यक्ष हजर झाले, तेव्हा या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला.

तेथील नागरिकांनी जेव्हा साशंकतेने त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी अत्यंत उत्साहात आणि हसतमुखाने सर्वांना उत्तर दिले. संवाद दरम्यान डॉ. प्रमोद सावंत यांनी उपस्थितांना आश्वस्त केले की, "शस्त्रक्रियेनंतर मी आता पूर्णपणे ठणठणीत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT