IRONMAN 70.3 Dainik Gomantak
गोवा

IRONMAN 70.3: 'आयर्नमॅन'ला मुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा! स्पर्धेला जल्लोषात सुरुवात

ट्रायथलॉनच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीत बदल

Kavya Powar

Goa CM Pramod Sawant flags off IRONMAN 70.3

आज सकाळी (8 ऑक्टोबर) गोव्यात मिरामार बीचवरून आयर्नमॅन ट्रायथलॉन स्पर्धेला मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. यानंतर स्पर्धेला जल्लोषात सुरुवात झाली आहे.

आयर्नमॅन ट्रायथलॉनच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.

  • आयर्नमॅन ७०.३ इंडिया इव्हेंटवेळी पहाटे ३ ते संपेपर्यंत मिरामार सर्कल येथील समुद्रकिनाऱ्याच्या बाजूने असलेला रस्ता मिरामार सर्कल ते हॉटेल विवांता मिरामार वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

  • डाव्या बाजूला असलेला रस्ता हा येण्याजाण्यासाठी वाहतुकीसाठी उपलब्ध केला जाणार आहे.

  • नेहमीच्या प्रवासी बसेस इतर मार्गावरून वळविण्यात आल्या आहेत. ज्या रस्त्यावर हा इव्हेंट होणार आहे तेथील परिसर नो पार्किंग व नो स्टॉपिंग झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.

  • डी. बी. मार्गावरील रहिवाशांसाठी मिरामार रेसिडेन्सी ते कांपाल येथील स्टारबक्स कॅफे येथपर्यंत रस्ता खुला असेल व त्यानंतर त्यांना आतील रस्त्याने पुढे जावे लागेल.

काय आहे 'आयर्नमॅन'?

अत्यंत खडतर आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पूर्ण करावी लागणारी स्पर्धा म्हणून आयर्नमॅन स्पर्धेची ख्याती आहे. या स्पर्धेत शारीरिक क्षमतेचा कस लागतो. जलतरण, सायकलिंग, रनिंग हे प्रकार स्पर्धेत पूर्ण करावे लागतात.

क्रीडा विश्वात आयर्नमॅन स्पर्धेला अत्यंत अवघड आणि आव्हानात्मक स्पर्धा मानली जाते. अनेक ट्रायअॅथलीट या स्पर्धेत यश मिळवण्यासाठी अपार मेहनत घेत असतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT