Financial Transactions Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: सरकारी ऑफिसमध्ये आता केवळ ऑनलाईन पद्धतीनेच आर्थिक व्यवहार होणार

Financial Transactions In Online Mode: सरकारी ऑफिसमधील सर्व कॅश काउंटर आता बंद होणार, मुख्यमंत्र्यांची माहिती

Ganeshprasad Gogate

CM Pramod Sawant: भारत सरकारने 2015 मध्ये सुरू केलेली डिजिटल इंडिया ही एक मोठी मोहीम असून याच्या अंमलबजावणीमुळे देशातील विविध क्षेत्रांमध्ये सरकारी सेवा सहजतेने उपलब्ध होत आहेत.

याच पार्श्वभूमीवर गोव्यातील सरकारी ऑफिसमधील सर्व कॅश काउंटर आता बंद होणार असून इथून पुढे केवळ ऑनलाईन मोड पद्धतीनेच आर्थिक व्यवहार करता येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.

पर्वरी येथे आज ‘कौटिल्य लेखा भवन' या लेखा संचालनालयाच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी मंचावर पर्यटन मंत्री रोहन खंवटे, पीडब्ल्यूडी मंत्री नीलेश काब्राल, आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, संचालक दिलीप हुम्रसकर, सचिव व्ही. कांडावेळू व अन्य अधिकारी उपस्थित होते.

विशेष म्हणजे व्यवहारांमध्ये पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सर्व पैशांचे व्यवहार ऑनलाइन केले जात आहेत.

त्यातच आता सरकारी कार्यालयांमध्ये देखील ऑनलाईन मोड पद्धतीने आर्थिक व्यवहार होणार असल्याने गोव्यात या योजनेला बळकटी प्राप्त होणार आहे.

तसेच सरकारी आस्थापनांमधील गोमंतकीय कर्मचाऱ्यांना सरकारी गृहकर्ज योजनेचा लाभ घेता येणार असून दिवाळीच्या प्रारंभी मुख्यमंत्री सावंत यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना ही मोठी खुशखबर दिली आहे.

किमान 4 टक्के दराने सर्वांना घरासाठी कर्ज देण्याची योजना राबविण्याचा विचार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यापूर्वीच सांगितले होते. ही योजना कशी असेल तसेच कर्ज मर्यादा किती असेल याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

SCROLL FOR NEXT