Goa CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

मराठी - कोकणी वादानंतर पहिल्यांदाच बोलले मुख्यमंत्री, राजभाषा कायद्याबाबत केलं महत्वाचं विधान

Konkani Marathi Controversy: मावजो यांनी त्यांच्या वक्तव्यावर ठाम असल्याची प्रतिक्रिया दिल्यानंतर या वादावर काही पडदा पडला नाही.

Pramod Yadav

Goa CM Comment On Konkani Marathi Controversy

पणजी: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोकणी साहित्यिक दामोदर मावजो यांनी राजभाषा कायद्यात मराठीला स्थान नको, असे वक्तव्य केल्याने वाद झाला. मावजो यांच्यावर मराठीप्रेमींनी टीका करत संताप व्यक्त केला. तालुकास्तरावर एकवटलेल्या मराठी प्रेमींनी मावजो यांच्याकडून माफीची मागणी केली. दरम्यान, या वादानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पहिल्यांदाच भाष्य केले.

राजभाषा कायद्यात मराठी भाषेला स्थान नको. ज्या प्रदेशाची जी भाषा तीच राजभाषा असा निकष असल्याने गोव्याची कोकणी भाषा होते. त्यामुळे मराठीला स्थान का? कोणत्याही राज्यात राजभाषा कायद्यात दोन भाषांना स्थान नाही, असे वक्तव्य कोकणी लेखक दामोदर मावजो यांनी केले.

मावजो यांच्या वक्तव्याने राज्यभरातून मराठीप्रेमींनी संताप व्यक्त केला. मावजो यांनी याचवेळी असे वक्तव्य करण्याचे कारण काय? रोमी लिपीची मागणी होत असल्याने भीतीतून त्यांनी असे वक्तव्य केले असावे, अशा प्रतिक्रिया विविध स्तरातून समोर यायला लागल्या.

मावजो यांनी त्यांच्या वक्तव्यावर ठाम असल्याची प्रतिक्रिया दिल्यानंतर या वादावर काही पडदा पडला नाही. दरम्यान, मराठी प्रेमींनी मावजो यांच्यासारख्या जबाबदार व्यक्तीने अशाप्रकारचे वादग्रस्त वक्तव्य करणे योग्य नसल्याचे मत मांडले.

गेल्या आवड्यात या वादाने राज्यभरात राजभाषा कायद्याबाबत चर्चांना उधाण आल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याप्रकरणी पहिल्यांदाच भाष्य केले आहे.

राजभाषा कायद्यात कोणताही बदल होणार नाही. कायद्यात दुरुस्ती करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा अधिवेशनात देखील मी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

दरम्यान, मराठी अकादमी मंडळाच्या शिष्टमंडळांनी देखील मुख्यमंत्री सावंत यांची मंगळवारी भेट घेतली. यावेळी राजभाषा कायद्यात यापुढे कसलाच बदल होणार नसल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी मराठी अकादमीला दिल्याचे अध्यक्ष प्रा. अनिल सामंत यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT