CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant : गोव्याला प्लास्टिकमुक्त करण्याची जबाबदारी पंचायतींची

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची सूचना; कौशल्यपूर्ण युवक घडवण्याचंही आवाहन

गोमन्तक डिजिटल टीम

CM Pramod Sawant : गोव्याला प्लास्टिकमुक्त करण्याची जबाबदारी पंचायतींची असल्याचं वक्तव्य गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केलं आहे. मनुष्यबळ विकास, कौशल्यपूर्ण गोमंतकीय युवक घडवण्यासाठीही पंचायतींनी पुढाकार घ्यावा, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. गोव्याला स्वयंपूर्ण बनवण्यासाठी गोवन ब्रँड म्हणून नाचणी पिकाच्या लागवडीला प्रोत्साहन देणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

यासोबतच गोव्याला विकासाच्या मार्गावर पुढे नेण्यासाठी पंचायतींनी पुढाकार घेण्याचं आवाहनही मुख्यमंत्री सावंत यांनी केलं आहे. पंचायतींनी ऑनलाईन सेवा तसंच नैसर्गिकरित्या शेती करण्यावर भर द्यावा, असं आवाहनही मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत मंत्र्यांनाही पंचायतींसोबत काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. स्वयंपूर्ण गोवा 2.0 मोहिमेअंतर्गत यापुढे प्रत्येक मंत्र्याला महिन्यातून किमान एकदा पंचायतींशी संवाद साधणं बंधनकारक असेल.

येत्या पाच वर्षांत पर्यटनाच्या आदरातिथ्य (हॉस्पिटॅलिटी) क्षेत्रात दोन लाखांपेक्षा अधिक नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या संधीचे गोमंतकीयांनी सोने करावे, अन्यथा बाहेरील लोक येऊन त्याचा फायदा घेतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नुकतंच केलं होतं. या संधीचे सोने केल्यास गोव्यात कुणीही बेरोजगार राहणार नाही, असा दावाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला होता.

‘स्थानिकांनी नोकऱ्यांचा लाभ घ्यावा’

सरकारी नोकरीत सर्वांनाच नोकऱ्या मिळू शकत नाहीत. मात्र, कौशल्य विकास शिक्षणाच्या माध्यमातून शंभर टक्के नोकऱ्या देण्याची ताकद सरकार तसेच खासगी उद्योग क्षेत्राकडे असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला होता. ते म्हणाले, की पर्यटन क्षेत्राच्या आदरातिथ्य, आयटी, इलेक्ट्रॉनिक उत्पादन सिटी तसेच मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये गोव्यात मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध होत होत आहे. त्याचा फायदा गोमंतकीय युवकांनी घ्यावा. आसाम तसेच इतर राज्यांतील युवक हे गोव्यात ‘व्हाईट कॉलर जॉब’ करतात. या संधीचा स्थानिकांनी फायदा करून घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT