Goa Bhavan In Ayodhya  Dainik Gomantak
गोवा

Goa Bhavan In Ayodhya: अयोध्येत होणार 'गोवा भवन', मुख्यमंत्र्यांची रामलल्लाच्या दर्शनानंतर घोषणा

मुख्यमंत्री सावंत यांनी सपत्नीक रामलल्लाचे दर्शन घेऊन गोवा आणि गोमन्तकीयांच्या सुख आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली.

Pramod Yadav

Goa Bhavan In Ayodhya

गोवा सरकारच्या संपूर्ण मंत्रिमंडळाने अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेतले. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील 21 सदस्यांची टीम अयोध्येत महर्षी वाल्मिकी विमानतळावर दाखल झाली.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासोबत यावेळी त्यांची पत्नी सुलक्षणा सावंत या देखील उपस्थित होत्या. मुख्यमंत्री सावंत यांनी सपत्नीक रामलल्लाचे दर्शन घेऊन गोवा आणि गोमन्तकीयांच्या सुख आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली.

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आणि गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर सोबत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

अयोध्येतील राम मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठापना केली याबाबत मुख्यमंत्री सावंत यांनी पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले. 22 जानेवारी रोजी गोव्यातील प्रत्येक मंदिरात भजन प्रभू रामाची पूजा करण्यात आली, अशी माहिती सावंत यांनी यावेळी दिली.

कळंगुटचे आमदार मायकल लोबो आणि दिलायला लोबो यांनी देखील रामलल्लाचे दर्शन घेतले. लोबो यांनी इन्स्टाग्रामवर रामलल्लाच्या दर्शनाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

उत्तर प्रदेश सरकारने जागा दिल्यानंतर अयोध्येत गोवा भवन उभारणार असल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी पत्नी सुलक्षणा सावंत यांच्यासह अयोध्येत श्री रामल्लाचे दर्शन घेत गोव्यातील जनतेसाठी प्रार्थना केली.

अयोध्येतील हे मंदिर राम मंदिर नसून ते राष्ट्र मंदिर असल्याचे मुख्यमंत्री सावंत म्हणाले. प्रभू रामाच्या नगरीत रामलल्लाला पाहण्याची संधी मिळाली. गोव्यातून 2000 भाविक आमच्यासोबत राम दर्शनासाठी रेल्वेने अयोध्येत आले आहेत. आम्ही प्रत्येक गोमन्तकीयाला अयोध्येचे दर्शन घडवू असेही मुख्यमंत्री म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026 Final: आरसीबीने रचला इतिहास! गुजरातचा धुव्वा उडवत दुसऱ्यांदा कोरलं 'आयपीएल' ट्रॉफीवर नाव, किंग कोहलीचा 'विराट' शो!

गोव्याकडे येणारी बस अंकोल्यात उलटली; एकाचा मृत्यू, 20 प्रवासी गंभीर जखमी; चालकाचे सुटले नियंत्रण

Stray Cattles: डिचोलीतील चौपदरी बगलमार्गावर मोकाट गुरांचा उपद्रव कायम, अपघातांचा धोका; दोन वर्षांत 15 गुरांचे बळी

Dabolim Airport: दाबोळी विमानतळ अव्वल दहातून बाहेर! 3 महिन्यांत 3.21 लाख प्रवासी कमी; विमान वाहतुकीत मंदीचे संकेत

वीरेश बोरकर यांची वाढती लोकप्रियता मनोज परब यांना खुपली? 'रिव्होल्युशनरी गोवन्स' पक्षाच्या चिंधड्या उडण्यामागचं खरं कारण काय?

SCROLL FOR NEXT