Mahadayi Water Dispute | Goa CM Dr Pramod Sawant vs Karnataka CM Basavraj Bommai  Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute: 'म्हादई'वरून प्रमोद सावंत यांनी कर्नाकटच्या मुख्यमंत्र्यांना सुनावले...

कुणी काहीही म्हणो, म्हादईचा लढा आम्हीच जिंकणार असल्याचा सावंत यांचा विश्वास

Akshay Nirmale

Mahadayi Water Dispute: गोव्याने कितीही प्रयत्न केले तरी काहीही फरक पडणार नाही, आम्ही म्हादई प्रकल्पाचे काम पुर्ण करणारच असे वक्तव्य करणाऱ्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना आता गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

कुणी काहीही म्हणो पण म्हादईचा लढा आम्हीच जिंकणार, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, कुणाला काही म्हणायचे आहे ते म्हणो. आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत. कायदेशीरदृष्ट्या, तांत्रिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या म्हादई बचावासाठी जे काही करण्याची गरज आहे ते आम्ही करत आहोत आणि आम्ही ते यापुढेही करत राहू. म्हादईचा लढा आम्हीच जिंकू.

केंद्रीय जल आयोगाने म्हादई प्रकल्पाबाबत कर्नाटकच्या डीपीआरला मंजुर दिल्यानंतर गोव्यात जनक्षोभ उसळला असून आता 'आमची म्हादय आमका जाय' असा नारा देत जनआंदोलनही सुरू झाले आहे. तथापि, कर्नाटकच्या मंत्र्यांकडून मात्र गोव्याच्या जखमेवर मीठ चोळणारी वक्तव्ये केली जात आहेत.

नुकतेच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी म्हटले होते की, केंद्र सरकारकडून डीपीआरला मंजुरी मिळाल्यामुळे आम्ही आता लवकरच म्हादई प्रकल्पाचे काम सुरू करणार आहोत.

याबाबत गोव्याने कितीही प्रयत्न केले तरी आम्हाला काहीही फरक पडणार नाही. लवादाच्या निवाड्याप्रमाणेच आम्ही प्रकल्पांचे काम हाती घेतले आहे, असे बोम्मई म्हणाले होते.

दरम्यान, मंगळवारीच राज्याचे वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो यांनीही कर्नाटक सरकारवर टीका केली होती. भविष्यातील युद्धे ही पाण्यासाठी लढली जातील, आणि म्हादई त्याची सुरवात आहे.

गोव्यातील 61 अन्न प्रक्रिया उद्योगांची वार्षिक उलाढाल सुमारे 25 हजार कोटी रूपये असून जर म्हादई वाहती राहिली नाही तर हे उद्योग आणि पर्यायाने उलाढाल ठप्प होईल. कर्नाटकात सध्या निवडणुकीचे वारे आहे, त्यामुळे म्हादईवरून राजकीय वक्तव्ये केली जात आहेत, असे गुदिन्हो म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dance Viral Video: माझ्या डोईवरी भरली घागर रे... कोकणातल्या पोरांचा डान्स पाहून तुम्हीही म्हणाल, 'एक नंबर...'

Vice President Candidate: ठरलं! एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा

America Firing: गोळीबाराने हादरले 'न्यूयॉर्क'! नाइट क्लबमध्ये बेछूट गोळीबार, 3 ठार, 8 जखमी

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

SCROLL FOR NEXT