Manohar International Airport  Dainik Gomantak
गोवा

Manohar International Airport : उद्या पहिली फ्लाईट उतरणार, विमानतळ परिसरात जमावबंदीचे आदेश

मोपा विमानतळ 5 जानेवारी पासुन कार्यान्वित होणार

गोमन्तक डिजिटल टीम

मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ 5 जानेवारी पासुन कार्यान्वित होणार आहे. या विमानतळावर पहिल्याच दिवशी ११ विमान उड्डाणे असतील. टॅक्सी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्गापासून मोपा विमानतळ परिसरापर्यंत जमावबंदीचे १४४ कलम लागू केले आहे. गोव्यात येणाऱ्या प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा अडथळा आणू नये अन्यथा कडक कारवाई केली जाईल असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

दरम्यान, मोपा विमानतळावर इंडिगो कंपनीचे फ्लाइट क्रमांक 6E 6145 हे हैद्राबाद - गोवा पहिले विमान उतरणार आहे.  यासाठी जीएमआर कंपनीच्या वतीने पहिल्या विमानातील प्रवाश्यांच्या स्वागतासाठी मोठी तयारी केली आहे.

पेडणे तालुक्यातील टॅक्सी चालकाने त्यांच्या काळ्या पिवळ्या टॅक्सीसाठीचे स्वतंत्र काउंटर सुरू करावे अशी मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला आहे. या टॅक्सी चालकांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या परिसरात जमाबंदीचे आदेश देण्यात आले असून कलम १४४ लागू करण्यात आले आहे. त्यामुळे मोपा विमानतळावर उतरणाऱ्या प्रवासी आणि पर्यटकांना कोणत्याही प्रकारच्या अडथळा आणू नयेत अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा सज्जड दम मुख्यमंत्री सावंत यांनी दिला असून पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT