Goa cristmas: Dainik Gomantak
गोवा

बाजारात नाताळची धूम! ख्रिसमस ट्री, सजावट साहित्याची खरेदी जोरात; ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी खास ऑफर

Goa cristmas: राज्यात नाताळाची लगबग सुरू झाली असून सर्वत्र तयारी, खरेदी, रंगरंगोटी आदीची लगबग सुरू झाली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: राज्यात नाताळाची लगबग सुरू झाली असून सर्वत्र तयारी, खरेदी, रंगरंगोटी आदीची लगबग सुरू झाली आहे. नाताळासाठी लागणारे साहित्य बाजारात दाखल होऊ लागले आहे.

सजावटीचे सामान, विद्युत रोशणाईच्या माळा, ख्रिसमस ट्री, सांताचे मुखवटे, स्नोबॉल, टोप्या, तयार गोठे आणि रंगीबेरंगी नक्षत्रे, चांदण्या, गोठ्यात ठेवण्यासाठी लागणाऱ्या मूर्ती आदी साहित्य दाखल झाले असून नाताळ सणाला आता केवळ आठवडा राहिला असल्याने बाजारात साहित्य खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू झाली असून पणजीतील बाजारपेठ नाताळमय झाल्याचे चित्र आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सजावटीच्या साहित्याच्या दरांमध्ये १० ते १५ टक्क्यानी वाढ झाली आहे. ख्रिसमस ट्री दीड हजारापासून सात हजार व त्याहून अधिक किमतीने विकल्या जात आहेत.

नक्षत्रे २५० ते हजार व त्याहून अधिक किमतीने विकली जात असून गोठ्यासाठी लागणाऱ्या मूर्त्या, विविध सजावटीचे साहित्य, ग्रीफ पॅकीट आदी विविध वस्तूंची खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे.

खास ऑफर

पणजी बाजारात मोठ्या प्रमाणात सजावट साहित्य, फटाके खरेदीची दुकाने बाजार परिसरात थाटण्यात आली आहे. दुकानदार ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी, आपल्याकडे मोठ्या प्रमाणात खरेदी करावीत यासाठी ख्रिसमस ऑफर देत आहेत.

अनेक ठिकाणी आता नाताळनिमित्त मोठ्या प्रमाणात बेबिंका, दोदोल व इतर मिठाई देखील विक्रीसाठी बाजारात दाखल झाल्या असून ग्राहकांकडून त्यांच्या खरेदीला चांगला प्रतिसाद लाभत असल्याचे विक्रेते सांगतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Birch Club Case: 'बर्च' क्लबच्या बनावट NOC प्रकरणात लुथरा बंधूंच्या जामिनावर पुन्हा सुनावणी; 2300 पानी दोषारोपपत्रामुळे प्रकरण गंभीर

GFA Award: गोव्याच्या फुटबॉलमधील दोन दिग्गजांचा गौरव! शिवानंद साळगावकर, मॉरिसियो आफोन्सो यांना जीवनगौरव पुरस्कार

Headland Sada Shed Case: 'मुरगावचा राजा'च्या अनधिकृत शेडवर हायकोर्टचा दणका! बुधवारपर्यंत पाडकाम करा, अन्यथा मुख्याधिकाऱ्यांवर अवमानाची कारवाई

Hospital Staff Shortage: रुग्णसंख्या चौपट वाढली, कर्मचारी मात्र जैसे थे! मडगाव जिल्हा इस्पितळावर दररोज 2 हजार रुग्णांचा भार; 193 पदे रिक्त

Goa Politics: महाआघाडीची खिचडी शिजेना; काँग्रेसच्या नेत्यांची चिंता मिटेना! विरोधकांचे दरवाजे खुले, पण हातमिळवणीला मात्र खिळे

SCROLL FOR NEXT