Salcete Dainik Gomantak
गोवा

Goa Christmas: बाजारपेठ झगमगली; सासष्टीत नाताळची लगबग सुरु..

बाजारपेठ सजली : तयार गोठा, सजावट साहित्य खरेदीला गर्दी

दैनिक गोमन्तक

Salcete: अवघ्या अकरा दिवसांवर येऊन ठेपलेल्या नाताळसाठी सासष्टीत ख्रिस्ती बांधव येशु ख्रिस्ताच्या जन्मदेखाव्याचे गोठे तयार करण्यात ,घराची रंगरंगोटी, मोठ्या आकारातील स्टार तयार करण्यात गुंतले आहेत. नाताळसाठी सजावट साहित्याने बाजारपेठ सजली असून सणाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी ख्रिस्ती बांधवांनी खरेदीला सुरुवात केली आहे.

‘मेरी ख्रिसमस' असा संदेश देणारी लहान मोठ्या आकारातील स्टिकर्स , येशू ख्रिस्त जन्मदेखव्याचे गोटे, विविध प्रकारचे स्टार्स , जिंगल बेल्स, सांताक्लॉजचे मुखवटे, बाजारपेठेत दाखल झाले आहेत. स्नो फॉलचा आभास दर्शविणारे आठ ते दहा फूट उंचीचे ख्रिसमस ट्री लक्ष वेधून घेत असून विद्युत रोषणाईने सजविलेल्या ख्रिसमस ट्रीचेही विशेष आकर्षण आहे.

या महिन्याच्या चौथ्या रविवारी ख्रिसमस साजरा होत असून, येथील चर्चमध्ये सजावटीला वेग आला आहे. त्यामुळे बाजारपेठेतही चैतन्य चित्र आहे.

कोलवा, बाणावली, राय, कुडतरी, लोटली, चिंचणी, नावेली, मडगाव भागात सार्वजनिक येशूजन्म देखावे साकारले जात आहेत. मोठया आकाराचे स्टार बनवण्यात लहानथोर गुंतल्याचे दिसत आहे.

दीड हजारांपर्यंत पेहराव; 400रु.पासून तयार गोठा

मुलांबरोबरच सांताक्लॉजच्या पेहरावाला मोठ्यांकडूनही पसंती दिसत आहे. सांताक्लॉजची टोपी 25 ते 30 रुपयांपासून उपलब्ध असून आकारानुसार 200 ते 1500 रुपयांपर्यंत सांताक्लॉजचा पेहराव मिळत असल्याचे येथील विक्रेत्यांनी सांगितले. स्टार 50 ते 70 रुपयांपासून असून आकारातील स्टारसाठी दीड हजार रुपये मोजावे लागतात. तयार गोठा 400 रुपयांपासून उपलब्ध असून मोठे तयार गोठे दर 3 हजारांत मिळत आहेत. स्टार, बेल, ड्रम, चॉकलेट्स, गिफ्ट पॅकेट्स 100 रुपयांपासून सासष्टीत उपलब्ध आहेत.

ख्रिसमस ट्रीचे आकर्षण

यंदा प्रथमच आठ ते दहा फूट उंचीचे स्नो फॉलचा आभास दर्शवणारे ख्रिसमस ट्री बाजारात उपलब्ध आहेत. अश्वावर विराजमान सांताक्लॉजचे पुतळे, आकर्षक स्टीकर्स लक्ष वेधून घेत आहेत

चर्चमध्ये तयारीला वेग

सासष्टीत अनेक ठिकाणी चर्च आहेत. याठिकाणी येशूचा जन्मसोहळा साजरा करण्यात येणार असून, त्यासाठी सार्वजनिक स्तरावर गोठा तयारी जोरात सुरु आहे. अनेक चर्चमध्ये रंगरंगोटी, रोषणाई केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT