Goa Christmas 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Christmas 2023: राज्यभर ख्रिसमसचा उत्साह; चर्चमध्ये येशूचा जन्मोत्सव साजरा

Goa Christmas 2023: ख्रिस्ती बांधवांनी मोठ्या संख्येने सामूहिक प्रार्थनेत भाग घेतला

Ganeshprasad Gogate

Goa Christmas 2023: राज्यभरात आज ख्रिसमसचा उत्साह पाहायला मिळाला. राज्यातील विविध चर्चमध्ये येशू जन्माचा उत्सव साजरा केला गेला. काल पर्यंत चर्चना आकर्षक रंगरंगोटी, रोषणाई सारखी जय्यत तयारी करण्यात आली होती.

अखेर रात्री 12 वाजता राज्यातील विविध चर्चमध्ये येशू जन्माचा उत्सव साजरा करण्यात आला. राजधानी पणजीतील इमॅक्युलेट कन्सेप्शन चर्चमध्ये ख्रिसमसच्या निमित्ताने ख्रिस्ती बांधवांनी मोठ्या संख्येने सामूहिक प्रार्थनेत भाग घेतलेला दिसून आला.

चर्चमध्ये प्रभू येशूच्या आगमनाचं गीतही गायलं. यानंतर चर्चच्या फादरनी सर्वांना आशीर्वाद देवून, ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या.

तर डिचोलीतील चर्चमध्येही ख्रिस्ती बांधवांनी सामूहिक प्रार्थना केली. येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या कहाणीवर आधारित देखावे तयार करण्यात आले होते.

दरम्यान भारतासह जगभरात ख्रिसमसचा उत्साह पाहायला मिळतोय. विविध चर्चमध्ये येशू जन्माचा उत्सव साजरा केला जात असून चर्चना आकर्षक रोषणाई करण्यात आल्याचं चित्रही दिसतंय.

चैतन्य, आनंद आणि उत्साहाचं प्रतिक असलेला ख्रिसमस या सणाला संपूर्ण ख्रिश्चन समाजात मोठं महत्व असून 25 डिसेंबर हा दिवस प्रभू येशूंचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT