Catholic Community Gathered At Margoa Police Station  Dainik Gomantak
गोवा

सुभाष वेलिंगकरांना अटक होणार का? गोव्यात कॅथलिक समाज आक्रमक, पोलिस स्थानकांवर निदर्शने

Goa Crime: सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांची डीएनए चाचणी संदर्भात केलेल्या आक्षेपार्ह विधानासाठी वेलिंगकर यांना त्वरित अटक करण्याची मागणी संतप्त जमावाने केली.

Pramod Yadav

मडगाव: सुभाष वेलिंगकर यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात राज्यभरातील कॅथलिक नागरिक आक्रमक झाले आहेत. राज्यात विविध ठिकाणी पोलिस स्थानकांवर निदर्शने करत नागरिकांनी वेलिंगकर यांच्या अटकेची मागणी केली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याप्रकरणी लक्ष घालून तात्काळ अटकेची कारवाई करावी, अशी मागणी केलीय.

मडगाव पोलिस स्थानकावर शेकडो ख्रिस्ती नागरिकांनी मोर्चा काढत वेलिंगकरांविरोधात घोषणाबाजी करून कारवाईची मागणी केली. सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांची डीएनए चाचणी संदर्भात केलेल्या आक्षेपार्ह विधानासाठी वेलिंगकर यांना त्वरित अटक करण्याची मागणी संतप्त जमावाने केली.

मडगाव पोलिस स्थानक परिसरात गोळा झालेल्या नागिकांच्या हातात यावेळी वेलिंगकरांच्या विरोधातील पोस्टर होते. नागरिकांनी पोस्टर झळकावत घोषणाबाजी केली. तसेच, मुख्यमंत्री सांवत यांनी यात लक्ष घालण्याची मागणी केली.

यापूर्वी हरमल येथे देखील ख्रिस्ती समाजातील नागरिकांनी पोलिस स्थानकावर जात वेलिंगकरांवर कारवाईची मागणी केली. यावेळी पोलिसांना तक्रारीचे निवेदन देखील देण्यात आले.

यापूर्वी देखील सुभाष वेलिंगकर यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यात लक्ष घालण्याची मागणी होत असल्याने वेलिंगकरांवर कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranbir Kapoor: राज कपूर फिल्म फेस्टिव्हलची घोषणा! IFFI 2024 मध्ये रणबीरने केलं जाहीर

Goa Fraud: शेअर मार्केटमधून चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने 100 कोटी लाटले, आरोपी लंडनला फरार; पोलिसांची शोध मोहीम सुरु!

Kulem Gram Sabha: कुळे ग्रामसभा तापली! ऑडिट रिपोर्टवरुन ग्रामस्थांनी सरपंचांना घेरले; मार्केट कॉमप्लेक्सच्या मुद्यावरुन वादंग

Goa News: कोट्यवधींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश, मुख्यमंत्र्यांनी दिले तात्काळ कारवाईची आदेश; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

Anjuna News: गोव्यात संगीत महोत्सवाचा वाद चिघळला, भर सभेत तरुणाला मारहाण; Video Viral

SCROLL FOR NEXT