Goa Chief Minister Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

मुख्यमंत्री प्रमोद सावंत उद्या मुंबई दौऱ्यावर

महाराष्ट्रातील राजकारण मागील दिवसांपासून चांगलच गाजत असताना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत उद्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रातील राजकारण मागील दिवसांपासून चांगलंच गाजत असताना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत उद्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे राजकीय खलबतांना पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. गोवा विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवून पुन्हा एकदा भाजपने सत्ता स्थापन केली. मात्र मुख्यमंत्री पदावरुन गोवा भाजपमध्ये दोन गट तयार झाले होते. मुख्यमंत्री पदाची माळ आरोग्यमंत्री विश्वजित राणे (Vishwajit Rane) यांच्या गळ्यात पडणार की, प्रमोद सावंत यांची पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर वर्णी लागणार याकडे अवघ्या गोवेकरांचा लक्ष लागलं होतं. मात्र अखेर प्रमोद सावंत (Chief Minister Pramod Sawant) यांना पुन्हा एकदा गोव्याचे मुख्यमंत्री बनवण्यात आले.

दरम्यान, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत उद्या मुंबईला (Mumbai) येत असल्याने अनेक राजकीय तर्क-वितर्क लढवले जात आहेत. गोव्याचे प्रभारी आणि महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय सत्ता समीकरणांना वेग आला आहे. दुपारी दोन वाजता भाजप प्रदेश कार्यालयात मुख्यमंत्री प्रमोद सावंत उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT