Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

IIT Goa : दक्षिण गोव्यातच होणार IIT प्रकल्प, मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार

सांगेतील नियोजित आयआयटी प्रकल्‍प जवळजवळ रद्द झाल्यातच जमा

गोमन्तक डिजिटल टीम

IIT Goa : नियोजित आयआयटी प्रकल्‍प हा दक्षिण गोव्यातच होणार आहे. त्यासाठी सरकारतर्फे जागेचा शोध सुरू आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज एका कार्यक्रमानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले.

सांगे येथील नियोजित आयआयटी प्रकल्‍प जवळजवळ रद्द झाल्यातच जमा आहे. आयआयटीसाठी सांगे येथे निश्‍चित केलेली जागा या कॅम्पससाठी पुरेशी नाही. त्यातील बहुतांश जमीन ही डोंगराळ भागात असल्याने केंद्र सरकारने त्यास मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे सरकारने आता दुसरी जागा शोधण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

दरम्यान, आयआयटी प्रकल्‍प सांगेतच व्‍हावा यासाठी यापूर्वी माजी आमदार प्रसाद गावकर यांनी सरकारकडे प्रयत्‍न केले होते. त्यानंतर सांगेचे विद्यमान आमदार तथा मंत्री सुभाष फळदेसाई यांनी तर आयआयटी सांगेतच होणार असा दावा केला होता. त्यासाठी सुमारे ८ लाख चौरस मीटर जमीनही पाहण्यात आली होती.

आयआयटी कॅम्पससाठी सुमारे १० लाख चौरस मीटरपेक्षा अधिक जमिनीची आवश्‍यकता आहे. सांगेत असलेल्या ८ लाख चौरस मीटर जागेपैकी काही जागा डोंगराळ भागात आहे. त्यामुळे या जागेला केंद्राने संमती दिलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT