CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: मुख्यमंत्री प्रमोद सावंत दिल्लीला रवाना

CM Pramod Sawant: दक्षिण गोवा उमेदवारीचा विषय पुन्हा ऐरणीवर

दैनिक गोमन्तक

CM Pramod Sawant:

एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज दुपारी दिल्ली गाठली आणि दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचा विषय पुन्हा ताजा झाला. मुख्यमंत्र्यांसोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे हेही दिल्लीला जाणार होते.

मात्र, विमान चुकल्याने तानावडे हे त्या समारंभात मुख्यमंत्र्यांसोबत उपस्थित राहण्यासाठी दिल्लीला पोचू शकले नाहीत. भाजपने सर्वत्र ‘कमळ’ ही निशाणी म्हणजेच उमेदवार, असे मानून प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे उमेदवार कोण हा विषय गौण ठरतो, असे मानणाऱ्या भाजपने आता उमेदवाराची निवडून येण्याची क्षमता हा निकष उमेदवारीसाठी लावणे सुरू केले आहे.

दिल्लीला जाण्यापूर्वी मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांनी भाजपला मोर्चाची बैठक पणजीतील कार्यालयात घेतली होती. त्यांची मतेही यासंदर्भात जाणून घेतली होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्याचा संबंध उमेदवारीशी लावण्यात येत आहे.
सुरवातीला प्रदेश पातळीवरून पाठवलेल्या नावांचा विचार उमेदवारीसाठी केला जाईल, असे वाटत होते. त्यानंतर महिलांची नावे या उमेदवारीसाठी सुचवावीत असे सांगण्यात आले होते.

'उमेदवारीबाबत ‘नरो वा कुंजरोवा’


भाजप पक्षश्रेष्ठी देतील तो उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी प्रदेश पातळीवर स्वीकारावी लागेल, असे सांगण्यात येत होते. महिलांची नावे मागवून घेतली, याचा अर्थ केवळ महिलांचाच विचार उमेदवारीसाठी केला जाईल असे नाही, अशी सारवासारव अलीकडच्या काळात मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष करू लागले आहेत. त्यामुळे दक्षिण गोव्यातून भाजपचा उमेदवार कोण, याची उकल मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर तरी होईल का, याविषयी उत्सुकता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT