Goa Chief Minister Pramod Sawant in RSS Uniform Dainik Gomantak
गोवा

'दसरा संचलन' कार्यक्रमात गोव्याचे मुख्यमंत्रीही संघाच्या वेषात

खाकी पॅन्ट, सफेद शर्ट आणि डोक्यावर टोपी असा संघाचा वेष परिधान आणि दांडा घेऊन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे या संचलन मिरवणुकीत सहभागी झाले

दैनिक गोमन्तक

डिचोली: विजयादशमीनिमित्त (Dussehra 2021) यंदाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे (RSS) डिचोलीत (Bicholim)'दसरा संचलन' चे आयोजन करण्यात आले होते. या संचलन मिरवणुकीला यंदाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) हेही या संचलनात उत्साहात सहभागी झाले होते. बोर्डे येथील कोराटीच्या मैदानावरून या संचलनाला सुरवात झाली. बोर्डे वडाजवळून भायलीपेठमार्गे जुन्या बसस्थानकाजवळून छत्रपती शिवाजी महाराज मैदानाला वळसा घालून आतीलपेठहून सोनारपेठमार्गे हिराबाई स्मृती सभागृहा जवळ येताच संचलनाची सांगता झाली.

मुख्यमंत्रीही संघाच्या वेषात

खाकी पॅन्ट, सफेद शर्ट आणि डोक्यावर टोपी असा संघाचा वेष परिधान आणि दांडा घेऊन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे या संचलन मिरवणुकीत सहभागी झाले होते. अन्य स्वयंसेवकांबरोबर त्यांनीही जवळपास अर्धा तास पायपीट केली.

Goa Chief Minister Pramod Sawant in RSS Uniform

डिचोलीचे आमदार तथा सभापती राजेश पाटणेकर हे प्रत्यक्ष संचलनात सहभागी झाले नव्हते. मात्र त्यांनी उपस्थित राहून संचलनाचा आस्वाद घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT