Goan News | Bhakti Kulkarni Dainik Gomantak
गोवा

Goan News: गोव्याला 21 वर्षांनंतर भक्तीच्या रुपात 'अर्जुन' पुरस्कार

Goan News: गोव्याची भक्ती कुलकर्णी अर्जुन पुरस्कार पटकावणारी तिसरी क्रीडापटू, तर पहिलीच महिला ठरली.

दैनिक गोमन्तक

Goan News: राष्ट्रीय क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेचा अर्जुन पुरस्कार पटकावणारी बुद्धिबळपटू भक्ती कुलकर्णी गोव्याची अवघी तिसरी क्रीडापटू, तर पहिलीच महिला ठरली. तब्बल 21 वर्षांनंतर गोमंतकीय 'अर्जुन'ने सन्मानित होईल. पुरस्कार समितीच्या शिफारशीवर सोमवारी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने शिक्कामोर्तब केले.

यापूर्वीचे गोव्याचे दोन्ही ‘अर्जुन’ वीर फुटबॉलमधील होते. ब्रह्मानंद शंखवाळकर यांना 1997 मध्ये, तर ब्रुनो कुतिन्हो यांना 2001 मध्ये अर्जुन पुरस्कार (Arjuna Award) मिळाला होता. राष्ट्रपती हस्ते येत्या 30 नोव्हेंबरला भक्तीला या पुरस्काराने गौरविण्यात येईल.

तेव्हा फुटबॉलव्यतिरिक्त इतर खेळातील गोव्यातील पहिली विजेती अर्जुन पुरस्कार विजेती हा मान भक्तीला प्राप्त होईल. भारतीय महिलांनी जिंकलेल्या ऐतिहासिक ऑलिंपियाड महिला सांघिक ब्राँझपदक, तसेच प्रथमच जिंकलेल्या जागतिक महिला रौप्यपदक संघाची भक्ती सदस्य आहे.

असाही योगायोग

भक्तीचे लहानपणापासूनचे प्रशिक्षक रघुनंदन गोखले हे द्रोणाचार्य पुरस्कार विजेते बुद्धिबळ मार्गदर्शक आहेत. तीस वर्षांनंतर त्यांच्या दुसऱ्या शिष्येला अर्जुन पुरस्कार मिळाला आहे. 1992 साली अनुपमा गोखले पुरस्काराची मानकरी ठरली होती. ‘माझ्या दोघा प्रशिक्षणार्थींना अर्जुन पुरस्कार मिळाला, हा योगायोग खूप आनंददायी आहे’, असे रघुनंदन गोखले म्हणाले.

भक्तीचे प्रमुख मानसन्मान

  • 2005 गोवा सरकारचा बक्षी बहाद्दर जीवबादादा केरकर पुरस्कार

  • 2010 वूमन इंटरनॅशनल मास्टर किताब

  • 2011-12 राज्य सरकारच्या दिलीप सरदेसाई क्रीडा नैपुण्य पुरस्काराची मानकरी

  • 2012 गोव्याची पहिली वूमन ग्रँडमास्टर

  • 2019 इंटरनॅशनल मास्टर किताब, गोव्याची पहिली महिला बुद्धिबळपटू

डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री-

प्रतिष्ठित अर्जुन पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल बुद्धिबळपटू, इंटरनॅशनल मास्टर भक्ती कुलकर्णी हिचे हार्दिक अभिनंदन. गोव्यातील लोकांसाठी अभिमानाचा क्षण!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT