Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa News: गोवा नागरी सेवेतही खांदेपालट; आठ अधिकाऱ्यांच्या सेवेत बदल!

Goa News: गोवा राज्य निवडणूक आयोगाचे सचिव ब्रिजेश मणेरकरांची गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली झाली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa News: गोवा नागरी सेवेतील वरिष्ठ श्रेणीतील 8 अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश काल कार्मिक खात्याने काढला. गोवा राज्य निवडणूक आयोगाचे सचिव ब्रिजेश मणेरकर यांची गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली झाली आहे व त्यांच्याजागी दर्शना नारूलकर यांची वर्णी लावण्यात आली आहे.

गोवा राज्य माहिती आयोगाचे सचिव भूषण सावईकर यांची उत्तर गोवा डीआरडीए प्रकल्प संचालकपदी, लघु बचत व लॉटरी खात्याच्या संचालक वर्षा नाईक यांची राज्य पोलिस तक्रार निवारण प्राधिकरणाच्या सचिवपदी, उत्तर गोवा डीआरडीए प्रकल्प संचालक शशांक ठाकूर यांची कार्मिक विभागाचे संयुक्त सचिव व ग्रामीण विकास खात्याच्या संचालकपदाचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे.

हस्तकला व टेक्स्टाईल खात्याचे संचालक अरविंद बुगडे यांची मनुष्यबळ विकास महामंडळ व्यवस्थापकीय संचालकपदी, कार्मिक विभागाच्‍या संयुक्त सचिव मेघना शेटगावकर यांची हस्तकला व टेक्स्टाईल खात्याच्या संचालकपदी, मुरगाव पालिका मुख्याधिकारी जयंत तारी यांची छपाई व सामग्री खात्याच्या संचालकपदी तसेच मुरगाव पालिका मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे.

गाड यांच्याकडे ‘लघु बचत व लॉटरी’

अबकारी आयुक्त नारायण गाड यांच्याकडे लघु बचत व लॉटरी खात्याच्या संचालकपदाचा, पीडब्ल्यूडी (प्रशासन) संचालक डॉ. गीता नागवेकर यांच्याकडे गोवा क्रीडा प्राधिकरण कार्यकारी संचालकपदाचा, गोवा मनुष्यबळ विकास महामंडळाच्या सचिव बिजू नाईक यांच्याकडे राज्य महिला आयोगाच्या सचिवपदाचा तसेच प्रसाद वळवईकर यांनी पुढील पदभार मिळेपर्यंत कार्मिक विभागाकडे हजेरी लावावी असे आदेशात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: घरात मंगलकार्याची चर्चा,कामात थोडे अडथळे येऊ शकतात; संयम ठेवा

Delhi Crime: एक महिन्यापासून देता होता त्रास, दुचाकीवरुन पाठलाग करुन विद्यार्थिनीवर केला ॲसिड हल्ला; ओळखीतल्या तरुणासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Ajinkya Rahane: "टीम इंडियाला माझी गरज..." 159 धावांच्या धडाकेबाज खेळीनंतर अजिंक्य रहाणेने निवडकर्त्यांवर साधला निशाणा!

Abbakka Devi History: पोर्तुगिजांनी युद्धाच्या आधी सैन्याचे तंबू पेटवून दिले, 'राणी अब्बक्का'ने अग्निबाण वापरला; अज्ञात इतिहास

Double Hat-Trick: अविश्वसनीय! एकाच डावात दोन गोलंदाजांनी घेतली हॅट्रिक, डबल हॅट्रिक घेणारे 'ते' दोन गोलंदाज कोण? Watch Video

SCROLL FOR NEXT