मुरगाव बंदरातील धक्का क्रमांक ५,६ वरील कोळशावर टाकलेले प्लास्टिकचे आच्छादन. Dainik Gomantak
गोवा

Goa: कोळसा प्रदूषणाच्या पहाणीसाठी केंद्रीय तपास पथक एम पी टीमध्ये दाखल

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे तपास अधिकारी मुरगाव पत्तन न्यासच्या धक्का क्रमांक ५,६ वरील असलेल्या कोळशाची प्रदूषणात वाढ झाली की नाही याची पाहणी करण्यासाठी आले आहे.

दैनिक गोमन्तक

दाबोळी: मुरगाव पत्तन न्यास (MPT) (Morgaon Port Trust) मध्ये कोळसा (carbo) वाढवण्याची शक्यता असून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे तपास अधिकारी (Investigating Officer of Central Pollution Control Board) धक्का क्रमांक ५ व ६ वर दाखल झाले आहे. रविवार (दि.२२) पासून कोळसा प्रदूषणाची पाहणी करण्यात येत असल्याने संपूर्ण धक्का क्रमांक ५,६ मधील कोळश्यावर प्लास्टिकचे आच्छादन टाकून बंदरात सांडलेला कोळसा साफ करण्यात अदानी, जिंदाल आस्थापनाचे कामगार व्यस्त असल्याचे दिसून आले आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे तपास अधिकारी मुरगाव पत्तन न्यासच्या धक्का क्रमांक ५,६ वरील असलेल्या कोळशाची प्रदूषणात वाढ झाली की नाही याची पाहणी करण्यासाठी आले आहे. एमपीटीच्या धक्का क्रमांक ५,६ मधील वाढत्या कोळशामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याची तक्रार गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाला बरोबर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला येथील काही बिगर सरकारी संस्था तसेच काही राष्ट्रीय राजकीय पक्षांनी तक्रार दाखल केल्या होत्या. मुरगाव बंदरातील धक्का क्रमांक ५,६ मध्ये चार मिलियन कोळसा आयात निर्यात करण्याची परवानगी देण्यात आली होती. त्या व्यतिरिक्त कोळसा वाढणार नसल्याची माहिती अदानी, जिंदाल व एमपीटी तर्फे देण्यात आली होती.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे तपास अधिकारी रविवारी मुरगाव बंदरातील धक्का क्रमांक ५,६ वर दाखल होताच जिंदाल, अदानी आस्थापनातर्फे बंदरात आयात निर्यात करण्यासाठी साठवून ठेवलेल्या कोळशावर प्लास्टिक आच्छादन टाकण्यात आले. तसेच बंदरात सांडलेल्या कोळसा यंत्राद्वारे साफ करण्यात आला आहे. मंडळाच्या तपास अधिकाऱ्यांनी दिवसाबरोबर रात्रीचीही कोळशाची तपासणी करण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे. जर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने अदानी, जिंदाल आस्थापनांना कोळसा प्रदूषण जास्त होत नसल्याचे प्रमाणपत्र दिल्यास मुरगाव बंदरात आणखीन कोळसा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तसेच मुरगाव बंदर ते होस्पेट हुबळीपर्यंत रेल्वे दुपदरी करण्यात येत असल्याने कदाचित केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी कोळसा प्रदूषणा चाचणी करण्यासाठी आले असल्याची शक्यता सध्या व्यक्त करण्यात येत आहे. रेल्वे दुपदरी करणाचे काम सुद्धा दक्षिण गोव्यात युद्धपातळीवर सुरू आहे. रेल्वे दुपदरीकरण पूर्ण झाल्यास, कदाचीत तपास अधिकाऱ्यांच्या सर्वेक्षणामूळे, भविष्यात मुरगाव बंदरात कोळसा वाढण्याची शक्यता आहे. चार मिलियन पेक्षा जास्त कोळसा बंदरात आल्यास येथे प्रदूषणात नक्कीच वाढ होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Origin of Goans: 6000 ईसापूर्व भारतीय पुरुषांचे इराणमध्ये स्थलांतर झाले; गोमंतकीयांच्या मूलस्थानाचा शोध

फोन देण्यासाठी दार उघडले, समोर दिसला मृतदेह; सॉफ्टवेअर अभियंत्याचा हणजूण हॉटेलमध्ये रहस्यमय मृत्यू

Goa Live News: 8 दिवसांत रस्त्याची दुरुस्ती न केल्यास खड्ड्यात 200 काजुची रोपे लावण्याचा ग्रामस्थाचा इशारा

Goan Architecture: ‘नीज-गोंयकारांनो’ जागे व्हा! लादलेल्या प्रोजेक्ट्समुळे पारंपरिक स्थापत्यकलेचा ‘सत्यानाश’ होतोय

Shivaji Maharaj: अफझल खान मारला गेला, त्याचा मुलगा फाजल कराडच्या मशिदीच्या मिनारांमध्ये लपला; प्रतापगडची लढाई

SCROLL FOR NEXT