Goa Component Day
Goa Component Day 
गोवा

Goa Statehood Day: घटक राज्य दिनी गोवा सरकारचा नवा उपक्रम?

गोमंन्तक वृत्तसेवा

पणजी : येत्या 30 तारखेला घटक राज्य दिवस(Goa Statehood Day) आहे. त्यादिवशी आभासी पद्धतीने कोणते कार्यक्रम करता येतील, याविषयी सर्व मंत्र्यांकडून मुख्‍यमंत्र्यांनी(GOA CM) सूचना मागवल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी(CM Pramod Sawant) काल सचिवांची बैठक मंत्रालयात घेतली. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे.(Goa to celebrates Statehood Day on 30th May)

घटक राज्य दिनाच्या निमित्ताने कोविड प्रतिबंधात्मक अशी कोणती तरी योजना सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे. त्याविषयी मुख्यमंत्र्यांनी काल सचिवांसोबत चर्चा केली. विविध खात्यांत कोणते उपक्रम सुरू आहेत. कोणते उपक्रम 30 मे रोजी नव्याने सुरू करता येतील वा एखादा नवा उपक्रम सुरू करता येईल काय? याची चाचपणीही मुख्यमंत्र्यांनी कालच्या बैठकीत केली. त्यांनी विविध खात्यांकडून कोविड काळात राबवल्या जात असलेल्या विविध योजनांचाही आढावाही घेतला. 

या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांना विचारले असता त्यांनी सांगितले, यंदा कोविडचा प्रादूर्भाव असल्याने घटक राज्य दिन मोठ्या प्रमाणावर साजरा करता येणार नाही. त्यामुळे आभासी पद्धतीने, पण चांगल्या रीतीने हा दिवस साजरा करण्याचा सरकारचा मानस आहे. त्याविषयी पूर्वतयारीसाठी काल सचिवांची बैठक घेतली. विविध खात्यांकडून आलेल्या सूचनांचा आढावा घेतला आहे. सहकारी मंत्र्यांकडूनही घटक राज्य दिन साजरा करण्याविषयी कल्पना मागवल्या आहेत. त्याविषयी सरकार निर्णय घेईल. ते म्हणाले, आभासी पद्धतीने घटक राज्य दिन साजरा करावा लागणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे कोविड महामारी प्रतिबंधक, असा कोणता उपक्रम त्या दिवशी सुरू करता येईल का? याचाही विचार सुरू आहे. येत्या एक दोन दिवसांतच त्याविषयी निर्णय घ्यावा लागणार आहे. सरकार त्याची तयारी करत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

Taleigao VP Election: 'पणजी कधीच सोडणार नाही', बाबूश यांचा विजयानंतर इशारा

Goa Today's Live News Update: उत्तर, दक्षिण गोव्यात भाजपचे 'कमळ' निश्चितच फुलणार

Russian In Goa: मद्यधुंद रशियन जोडप्याचा शिवोलीत राडा; पोलिसांसोबत हुज्जत, 108 ची मदत नाकारली

Loksabha Election 2024 : पंतप्रधान मोदींच्या यशासाठी मतदारांचे आशीर्वाद महत्त्‍वाचे : मुख्यमंत्री सावंत

SCROLL FOR NEXT