Goa: Faulty CCTV cameras in Quepem. Dainik Gomantak
गोवा

Goa: केपेतील सीसीटीव्ही कॅमेरे नादुरुस्‍त

Goa: सुरक्षेचा विषय ऐरणीवर, २००९ साली झाले होते उद्‍घाटन

Dainik Gomantak

केपे : माहिती तंत्रज्ञानाच्या युगात गुन्हेगारांना पकडण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV Camers Not Working In Quepem-Goa) महत्त्‍वाची भूमिका बजावत असल्याने केपे बाजारात २००९ साली लोकसभा खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी खासदार निधीतून सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. परंतु हे सीसीटीव्‍ही कॅमेरे गेल्या काही वर्षांपासून नादुरुस्त बनल्याने केपेतील सुरक्षेचा विषय ऐरणीवर आला आहे.

केपे बाजार हा तुलनेने बराच छोटा असला तरी केपे तालुका असल्याने येथे सर्व प्रमुख सरकारी कार्यालये आहेत. येथे रोज शेकडो लोक आपली कामे घेऊन येतात. अशा या प्रमुख बाजारातील एकही सीसीटीव्‍ही कॅमेरा चालत नसल्याबद्दल लोकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. खासदार सार्दिन यांनी या कॅमेऱ्यांचे उद्‍घाटन केले होते, मात्र त्यांची निगा कोण राखणार हे सांगितले नसल्याने या नादुरुस्त कॅमेऱ्यांचे कुणालाच काही पडून गेलेले नाही.

सध्या केपे पालिकेने व दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक कार्यालयातर्फे कॅमेऱ्यांची देखभाल केली जात नसल्याने केपे बाजारातील व तिळामळ येथे बसवण्यात आलेले सर्व कॅमेरे पूर्णपणे नादुरुस्त बनले आहेत, तर काही कॅमेरे गायब झाले आहेत. केपेत एखादी अप्रिय घटना घडल्यास गुन्हेगारांचा शोध लावण्यास पोलिसांना बरेच प्रयत्‍न करावे लागणार असल्याने हे सीसीटीव्‍ही कॅमेरे त्वरित सुरू करावेत, अशी मागणी होत आहे.

...म्‍हणून पालिका देखभाल करत नाही

याविषयी केपे पालिकेचे अभियंता नितीन कोठारकर यांना विचारले असता, त्यांनी सांगितले, की जेव्हा कॅमेरे बसवले होते त्यावेळी केपे पालिकेद्वारे त्यांची देखरेख केली जाणार असल्याचे सांगितले होते. मात्र, या कॅमेऱ्यांचे नियंत्रण दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक कार्यालयातून होत होते. वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना दंड देण्याचे काम त्‍यांच्‍याकडून सुरू होते. याचा फायदा पालिकेला होत नसल्याने नंतर पालिकेने आपण या कॅमेऱ्यांची देखभाल करणार नसल्याचे सांगितले होते, असे कोठारकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT