Sasashti  Dainik Gomantak
गोवा

Sasashti News : बीच, कॅसिनो, धागडधिंगा म्हणजे गोवा नव्हे : खंवटे

Sasashti News : चैतन्य गौरव : सांस्कृतिक परंपरेद्वारे पर्यटकांना आकर्षित करणे गरजेचे

गोमन्तक डिजिटल टीम

Sasashti News : सासष्टी, बीच, कॅसिनो, धागडधिंगा म्हणजे गोवा नव्हे. गोव्याची खरी श्रीमंत ही सांस्कृतिक परंपरेत आहे आणि याच सांस्कृतिक परंपरेद्वारे देश विदेशी पर्यटकांना गोव्याकडे आकर्षित करणे गरजेचे आहे. गोव्याची ही परंपरा सर्वांनी जपली पाहिजे, असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले.

मडगावात रवींद्र भवनात मुंबईच्या सारस्वत प्रकाशन व गोवा सारस्वत समाज यांच्या संयुक्त विद्यमाने २३ व्या सारस्वत चैतन्य गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. पर्यटनमंत्री खंवटे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. आमदार विजय सरदेसाई उपस्थित होते.

सारस्वतांसाठी गौरव सोहळा आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. तो मठग्राममध्ये संपन्न होत असल्याने आम्हांला अधिकच आनंद होत आहे. इतर समाजांना बरोबर घेऊन जाण्याची मोठी जबाबदारी सारस्वत समाजावर आहे. सारस्वत समाजातील गरजूंना समाजाने मदतीचा हात द्यावा, असे आवाहन दिगंबर कामत यांनी यावेळी केले.

गोवा सारस्वत समाजाचे अध्यक्षडॉ. जगन्नाथ (देश) प्रभुदेसाई, सारस्वत प्रकाशनाचे अध्यक्ष दिलीप भिसे तसेच गौरवप्राप्त मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. सारस्वत प्रकाशनचे कार्याध्यक्ष राजेंद्र देसाई यांनी आभार व्यक्त केले. प्रसाद कुलकर्णी व डॉ. स्मिता संझगिरी यांनी सूत्रसंचालन केले.

आयोजक कार्याध्यक्ष नवनाथ खांडेपारकर, गोवा सारस्वत समाजाचे शिरीष पै, सारस्वत प्रकाशनचे संपादक सुधाकर लोटलीकर, कार्यवाह राहुल साखळकर उपस्थित होते.

मान्यवरांचा सत्कार

या सोहळ्यात वकील प्रकाश श्रीरंग प्रभुदेसाई, शाणू आत्माराम पै पाणंदीकर, शेखर रवींद्र सरदेसाई, केशव (राजू) मेघश्याम नायक, रामनाथ पै रायकर, नितीन कुंकळ्ळीकर , डॉ. प्रदीप बोरकर, सारस्वत विद्यालय सोसायटी, पुर्ती अमेय लोटलीकर यांचा सन्मान करण्यात आला. तसेच सारस्वत प्रकाशनने घेतलेल्या कथा व कविता स्पर्धांतील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Waste Management: कचरा व्यवस्थापनाचे नियम पाळा, अन्यथा कारवाईची शक्यता; 385 घटकांवर प्रशासनाची नजर

Morjim School Repair News: महिना उलटूनही शाळेची दुरुस्ती रखडली; अंगणवाडी स्टेजवर, बालहक्क आयोगाची नाराजी

Morjim Beach Safety: मोरजी बीचवर गुरांचे कळप, भटक्या श्वानांचा उपद्रव; पर्यटन हंगामात पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न!

Ranji Trophy: गोव्याची फलंदाजी ठरतेय डोकेदुखी; विदर्भाविरुद्ध पराभवांची मालिका खंडित करण्याचे आव्हान

Rohit Sharma Dance Video: 'ले गई, ले गई' गाण्यावर रोहित शर्मानं धरला ठेका! करिश्मा कपूरसोबतचा डान्स व्हिडीओ व्हायरल; हिटमॅन म्हणाला, 'मजा आ गया'

SCROLL FOR NEXT